वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सरकारकडून कठोर निर्णयाचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

औरंगाबादः प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दुपटीने वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरीकांनी वेळीच सावध व्हावे अन्यथा कठोर निर्णय घेण्यावाचून पर्याय राहणार नसल्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून अनेक जण मास्क वापरण्याचे बंद केले आहे. त्याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल असा इशारा देत कोरोनावर कोणीही राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रश्नी आपण उद्या मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध घालण्याचे संकेत त्यांनी दिले.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांच्या भावना, “नदी म्हणजे नारीशक्ती… गोदा ते नर्मदा जलयात्रेतून नवीन विकास मॉडेल!” “ इतिहास, अध्यात्म, विकास आणि नारीशक्तीचा हा महासंगम!”

नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती ऊर्जा, शक्ती, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *