यवतमाळ, जळगाव, पुणेसह सांगली जिल्ह्यातही मध्यान्ह भोजनासाठी लागणारा तांदूळ पुरविण्यात केंद्रसरकार असमर्थ ठरत आहे असा आरोप करतानाच शिल्लक तांदूळ अथवा उधार घेतलेल्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागविण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर शाळा प्रशासन करत आहेत, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत केंद्राचे लक्ष वेधले. जयंत पाटील पुढे आपल्या ट्विटमध्ये …
Read More »राज ठाकरेंच्या त्या समर्थनावर अजित पवार म्हणाले, त्याचे समर्थन करत असेल तर दुर्दैवी गुजरातमध्ये उद्योग जाण्याचे राज ठाकरेंकडून समर्थन
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात येऊ घातलेले मोठे उद्योग प्रकल्प गुजरातमध्ये गेले. त्याचबरोबर तेलंगणामध्येही गेले. या उद्योग जाण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. पण, याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या विधानांमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. त्यामुळे राज्यातून …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसचा सल्ला, मुख्यमंत्री भाजपाच्या कुटील डावाला बळी पडू नका मुख्यमंत्री महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण करा
महाराष्ट्रातील भूमीपूत्रांच्या नोकरीचे आणि गुंतवणूकीचे संरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावे आणि भाजपाच्या कुटील डावाला बळी पडता कामा नये अशी भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन बॉलिवूड आणि उद्योग उत्तरप्रदेशमध्ये नेण्याचे केलेल्या विधानाचा महेश …
Read More »त्या डिलीट केलेल्या ट्विटवर जितेंद्र आव्हाडांचे स्पष्टीकरण, जो तुम करते हो… चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर
मागील काही दिवसांपासून आधी छत्रपती शिवाजी महाराजांवरून नंतर आता छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका दर्ग्यात जाऊन दर्शन घेतल्याचा फोटो ट्विट करत टीका …
Read More »जितेंद्र आव्हाड आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात रंगला औरंगजेब वरून कलगीतुरा एकमेकांवर पलटवार करत दिले प्रत्युत्तर
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते असे विधान केले. त्यावरून भाजपाने अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठविली. या टीकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सावरकर आणि गोळवलकर गुरूजी यांच्या पुस्तकातील संदर्भ देत …
Read More »अध्यक्षा चाकणकरांना चित्रा वाघ यांचा खोचक सवाल, आयोग पण बेफाम झालंय का? उर्फी जावेद यांच्यावर सु-मोटो कारवाई करायला वेळ नाही का?
‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी केली. यावरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केलं होतं. मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. …
Read More »अजित पवारांचे समर्थन करणाऱ्यांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे समर्थन सामनाने केले. मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाशी तडजोड करणाऱ्या सामनात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव लिहिण्याचा अधिकार नाही अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पालघर येथे केली. पालघर जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासात असताना पत्रकार परिषदेत …
Read More »अजित पवार म्हणाले, मी युक्तीवाद करणार नाही विरोधी पक्षनेते पद भाजपाने नव्हे तर राष्ट्रवादीने दिले
हिवाळी अधिवेशन काळात संभाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून अधिवेशन संपताच भाजपाने अजित पवार यांना लक्ष्य करत त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले. त्याचबरोबर भाजपाकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणीही केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मंगळवारी वाद संपविण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत केले. त्यानंतर आज बुधवारी विरोधी …
Read More »अजित पवार म्हणाले,… पण आजही मी स्वराज्य रक्षक भूमिकेवर ठाम महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपाच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी आंदोलनाचे षडयंत्र...
‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात मी कोणतंही वादग्रस्त विधान केलेले नाही. ‘स्वराज्यरक्षक’ ही संकल्पना व्यापक, सर्वसमावेशक, छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला ती शोभणारी आहे, त्यामुळे स्वराज्यरक्षक या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. सातत्याने महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांसह भाजपाच्या वाचाळवीरांना वाचविण्यासाठी, त्यांच्या बेतालपणापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून माझ्याविरोधात आंदोलनाचे षडयंत्र रचण्यात …
Read More »भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, आमच्या त्यांना शुभेच्छा चुकीने ३ जागा कमी सांगितल्या
मागील दोन दिवसांपासून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी लोकसभेच्या ४५ तर लोकसभेच्या २०० जागा जिंकण्याचा संकल्प जाहिर केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने लोकसभेत घवघवीत यश मिळवू अशी घोषणाही नड्डा यांनी केली. नड्डा यांच्या या घोषणेबद्दल आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …
Read More »
Marathi e-Batmya