Tag Archives: ncp

लोढांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, उचलली जीभ लावली टाळ्याला

काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी केल्यानंतर जो वाद निर्माण झाला. त्याची राळ खाली बसत नाही, तोच भाजपाचे राज्यातील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या घटनेची तुलना थेट शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून …

Read More »

नवाब मलिक यांना दिलासा नाहीच

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मागील काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जावर आज ३० नोव्हेंबर मुंबईतील सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. पण, न्यायालयाने नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पीठासमोर मलिक …

Read More »

गद्दारीचा किडा, मंगलप्रभात लोढा…;

गद्दारीचा किडा मंगलप्रभात लोढा… पन्नास खोके एकदम ओके… छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात त्यांच्याच मलबार हिल विधानसभा मतदारसंघात जोरदार आंदोलन करण्यात आले. भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदे यांच्या गद्दारीशी केल्याने …

Read More »

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात रायगड जिल्ह्यातील पालीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गीता पालरेचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ. …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा टोला, एकाबाजूला महापुरूषांबद्दल बोलू नका अन दुसऱ्याबाजूला…

मागील काही महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हे सातत्याने आपल्या राजकिय भूमिकेत धरसोडपणा करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच मागील दोन-तीन जाहिर सभेत राज ठाकरे यांनी हिंदूत्ववादी भूमिका जाहिरपणे घेतली. भाजपाच्या अनुशंगाने भूमिका मांडली. मात्र काल मनसे गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी काही प्रमाणात …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दोन्ही छत्रपतींनी भूमिका घेतलेली आहे त्यानुसार..

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण अद्यापही तापलेलं आहे. मात्र भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून त्याचबरोबर शिंदे गटाकडूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावरील कारवाईची म्हणावी तशी मागणी होत नाही. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मात्र राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या …

Read More »

विधिमंडळ समितीची बैठक आता पुढच्या महिन्यातः अधिवेशन एक आठवड्याचे?

मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता प्रथेप्रमाणे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आले आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशनही नागपूर येथे होत आहे. परंतु हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित होऊन दोन महिने जवळपास झाले. मात्र आगामी पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक असताना या समितीची सातत्याने बैठक पुढे ढकलण्यात …

Read More »

महिलांनी बाबा रामदेवच्या फोटोला जोड्याने हाणले…

रामदेव बाबाचे करायचे काय, खाली डोकं वर पाय… रामदेवबाबा हाय हाय… समस्त महिला भगिनींचा अपमान करणार्‍या रामदेव बाबाचा निषेध असो… मुखी राम राम बोला… याला जोड्याने हाणा… अशा जोरदार घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने बाबा रामदेवच्याविरोधात आज आंदोलन करण्यात आले. मुंबई प्रदेश कार्यालयासमोर मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, कार्याध्यक्षा राखी …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, गुवाहाटीला जाताय, कुणाचा बळी देणार

राज्यातल्या शिंदे फडणवीस सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या समर्थक ५० आमदार आणि खासदार घेऊन आसाम राज्यात गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा राज्यभर आहे. त्यावरुन कामाख्या देवीला रेड्याचा बळी देतात मुख्यमंत्री शिंदे नेमका कुणाचा बळी देणार असा बोचक सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडी …

Read More »

राष्ट्रवादीची कृषी दिंडी म्हणजे ‘सौ चूहे खा के…

अनेक वर्षे विदर्भावर अन्याय करून आणि विदर्भातील शेतकऱ्याची उपेक्षा करून आता विदर्भात कृषी दिंडी काढायला निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा म्हणजे, ‘सौ चूहे खा के असा प्रकार आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अशी दिंडी काढावीच, म्हणजे वर्षानुवर्षे विदर्भातील शेतकऱ्यावर केलेल्या अन्यायाचा पाढा या नेत्यांच्या तोंडावर …

Read More »