मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा दिल्ली वाऱ्या केल्या. मात्र महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांनी केंद्र सरकारकडे मदतीची काहीच मागणी केली नाही. जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतःचे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात व्यस्त होते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. विधान भवनातील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »अजित पवार म्हणाले, …दुप्पट मदतीचा निर्णय फसवा, धुळफेक करणारा एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने दुप्पट मदतीने अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा मिळणार नाही
विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीने झालेले पिकांचे, घराचे, शेतजमीनींचे नुकसान प्रचंड आहे. एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्याने सरकारने दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना जराही दिलासा मिळणार नाही. कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार व बागायतीसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आम्ही केली होती. ती मान्य न करुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांच्या तोंडाला …
Read More »शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंना म्हणाले, कोणी वाद वाढवित असेल तर लोक पाठिंबा… वेगळा पक्ष आणि वेगळे चिन्ह घेवू शकतात
जवळपास एक महिन्याहून अधिक काळ शिवसेनेला खिंडार पाडत वेगळा मार्ग स्विकारलेल्या एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची यावरून वाद निर्माण झाला आहे. तसेच यासह अनेक प्रश्नांवरून सर्वोच्च न्यायालयात लढाईही सुरु आहे. तरीही नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …
Read More »शरद पवार म्हणाले, भाजपा त्यांच्यासोबतच्या मित्रपक्षांना संपविते बिहारमधील राजकिय उलथापालथीनंतर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य
महाराष्ट्रानंतर संख्याबळाच्याबाबत दुसऱ्या स्थानी असलेल्या बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी भाजपाबरोबरील सरकारचा राजीनामा देत काँग्रेस, डावे आणि आरजेडीच्या सहकार्याने पुन्हा महागठबंधन सरकार स्थापन केले. भाजपा नेते सुनिल कुमार मोदी यांनीही महाराष्ट्राचे उदाहरण देत नितीशकुमार यांना इशारा दिला. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. शरद …
Read More »जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य, ‘त्या’ कहाण्या आठ-दहा दिवसात समोर येतील मुख्यमंत्र्यांनी जे सहकारी निवडले आहेत त्यांनी चांगलं काम करावं ;
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सहकारी निवडले आहेत त्यांनी चांगलं काम करावं, आम्ही महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करु व जनतेचे प्रश्न विरोधात बसून सोडवू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. आज शिंदेसरकारच्या १८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला असून या शपथविधीनंतर …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे-फडणवीस सरकारला मोदींच्या ‘त्या’ वाक्याचा विसर मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला मंत्र्यांचा समावेश नाही
सत्तांतरानंतर जवळपास ४० दिवस रखडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या दोन्ही पक्षांकडून महिला मंत्र्यांचा समावेशच करण्यात आला नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य …
Read More »लवासा प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात मागितली दाद मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल
लवासा या बहुचर्चित खाजगी हिल स्टेशनच्या विरोधात काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल कऱण्यात आली होती. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने या हिल स्टेशनच्याबाबत पवार कुटुंबियांच्या अधिकारावरून काही ताशेरे ओढले. मात्र त्यासंदर्भात कोणतेही गुन्हे नोंदविण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात नाशिकस्थित नानासाहेब जाधव यांनी आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल …
Read More »राष्ट्रवादीचा मोदींना सवाल; उत्पन्नाचे सोडा, महागाईमुळे त्या गोष्टीही मिळेना शेतकऱ्यांच्या उत्पन्न आणि वाढत्या महागाईवरून साधला निशाणा
येत्या १५ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. मात्र काही वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकाला स्वत:चे हक्काचे घर, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असे जाहिर आश्वासन दिले. मात्र आता १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसऱ्याबाजूला २०२२ मधील ६ महिने संपलेली असतानाही यातील …
Read More »जयंत पाटील म्हणाले, मला कळत नाही अशा बातम्या बाहेर कशा येतात अलिप्त राहिलेले जयंत पाटील झाले पुन्हा सक्रिय
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आदेश दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले. मात्र या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणातून काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गायब झाले. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून ते …
Read More »दिल्लीत शेवटच्या रांगेत मुख्यमंत्री शिंदे; रोहित पवार म्हणाले, हा मराठीजनांचा अपमान… नीती आयोगाच्या बैठकीनंतर झालेल्या फोटोसेशनमध्ये शिंदेंना शेवटचे स्थान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षतेखाली नीति आयोगाच्या सातव्या गर्व्हिनिंग कौन्सिलची बैठक पार पडली. मात्र या बैठकीनंतर झालेल्या फोटोसेशनवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अगदी शेवटच्या रांगेत स्थान देण्यात आले. विशेष म्हणजे या बैठकीला उपस्थित राहीलेल्या ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भाजपा आणि पंतप्रधान मोदी …
Read More »
Marathi e-Batmya