Breaking News

Tag Archives: police

इलेक्टोरल बॉण्ड खंडणीप्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासह अन्य नेत्यांवर गुन्हा बॉण्ड खरेदी खरेदीसाठी खंडणी प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल

बेंगळुरू पोलिसांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी यांच्यावर इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्णजे याप्रकरणात निवडणूक रोख्यांच्या योजनेशी संबंधित तक्रारींबाबत अनेक भाजपा नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर कलम ३८४ (खंडणीची शिक्षा) आणि १२०बी (गुन्हेगारी कट) अंतर्गत पोलिसांनी …

Read More »

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाटः पाच जण ठार पोलिसांचेही काही चालेना

मणिपूरमध्ये हिंसाचाराची नवीन लाट उसळली असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हल्ले आणि हत्येचे सत्र सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात आज सकाळी काही संशयित कुकी बंडखोरांनी राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे २३० किमी अंतरावर असलेल्या नुंगचप्पी गावावर हल्ला केल्यानंतर झालेल्या ताज्या हिंसाचारात किमान पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती …

Read More »

नाना पटोले यांची टीका,…निवृत्ती योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी सरकारच्या आशिर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुंडांना सरकारी आशिर्वाद मिळत असल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. महिला घरात व घराबाहेरही सुरक्षित नाहीत तर शाळेत मुलीही सुरक्षित नाहीत. आता तर कायद्याचे रक्षक पोलीसही सुरक्षित राहिले नाहीत. मुंबईतील माहिम पोलीस कॉलनीत एकाचवेळी १३ पोलिसांच्या घरावर दरोडा पडला व …

Read More »

राज ठाकरे यांची टीका, तुमची बहिण खरीच लाडकी असेल तर… मुख्यमंत्र्यांच्या जिल्हातच कायदा धाब्यावर

बदलापूर येथील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर जन आक्रोश जो काही निर्माण झाला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पनाही करवत …

Read More »

बदलापूर आंदोलक आणि पोलिसांमध्ये झडप; आंदोलक आपल्या मागणीवर ठाम मंत्री गिरीष महाजन, राज्य सरकारच्या आवाहनानंतरही आंदोलक आक्रमक

शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर बदलापूरातील रहिवाशांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच बदलापूर स्थानकात ठिय्या आंदोलन सुरु केले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरून हटविण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक सुरु केली. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळू नये या उद्देशाने पोलिसांनी माघार घेतली. त्यानंतर राज्य सरकारचे …

Read More »

दोन लहान मुलींवरील बलात्काराच्या घटनेवरून बदलापूरकर आक्रमक; रेल रोको आंदोलन सकाळपासून सुरु झालेले आंदोलन संध्याकाळ होत आली तरी सुरुच

दोन लहान शाळकरी मुलींवर शाळेतील शिपायाने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेवरून आज बदलापूरकर चांगलेच आक्रमक झाले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असली आरोपीला तात्काळ फाशी द्या या मागणीवरून बदलापूर रहिवाशी आक्रमक झाले. सुरुवातीला आंदोलक जमावाने ज्या शाळेत हि घटना घडली, त्या शाळेसमोर आंदोलकांनी आंदोलन सुरु केले. या घटनेमुळे …

Read More »

टिळक रूग्णालयाच्या महिला डॉक्टरला रूग्ण व नातेवाईकांकडून मारहाण हल्ल्यानंतर सर्वजण पळून गेले, पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

मुंबईतील सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील एका महिला डॉक्टरला रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली असून, ते सर्वजण मद्यधुंद अवस्थेत होते. या घटनेनंतर हल्लेखोर रुग्णालयातून पळून गेल्याने पोलीस त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. …

Read More »

हरियाणात इंटरनेट आणि एसएमएस सेवा २४ तासासाठी निलंबित कावड यात्रा आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारचा निर्णय

हरियाणा सरकारने २१ जुलै रोजी सुरक्षा वाढवली आणि मागील वर्षी हिंसाचार झालेल्या ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेपूर्वी २४ तासांसाठी नूह जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी नुह येथे जमावाने विश्व हिंदू परिषदेची मिरवणूक रोखण्याचा, दगडफेक आणि गाड्या पेटवण्याचा प्रयत्न केल्याने …

Read More »

“कोकेन” चित्रपटाचा फर्स्ट लूक आला समोर अभिमन्यू सिंग पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसत आहे, त्याची पत्नी क्राईम थ्रिलरची निर्माती 

मॉम , सूर्यवंशी यासह अनेक चित्रपटांमध्ये अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता अभिमन्यू सिंग आता दिग्दर्शक श्रावण तिवारीच्या जबरदस्त क्राईम थ्रिलर चित्रपट “कोकेन” मध्ये पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे ज्यामध्ये अभिमन्यू सिंगच्या व्यक्तिरेखेची किनार दिसत आहे. या चित्रपटाची एक खास गोष्ट म्हणजे अभिमन्यू सिंगची …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, … डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण

मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक …

Read More »