सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, पोलिसांवर गुन्हे दाखल करा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला

परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कस्टडीमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज एका महत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती विधिमंडळात देत अपराधी पोलिसांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकेवर निकाल देताना सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत संबधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

यासंदर्भातील सुनावणीची माहिती अॅड प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटद्वारे माहिती दिली, महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या महत्त्वपूर्ण खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने विजयबाई सूर्यवंशी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. या प्रकरणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर एका आठवड्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात पोलीस सर्वोच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ४ जुलै रोजी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, या विरोधात पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सकाळी या संदर्भातील सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

त्यामुळे विजयाबाई सूर्यवंशी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातील त्यांच्या कायदेशीर लढ्याला अखेर यश मिळाल्याचे मानले जात आहे. ॲड प्रकाश आंबेडकर यांनी या खटल्याच्या निकालाबाबत समाधान व्यक्त केले

या केसमध्ये पीडित सुर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर, ॲड. प्रतीक बोंबार्डे, ॲड. कीर्ती आनंद यांनी बाजू मांडली.

 

About Editor

Check Also

ममता बॅनर्जी यांचा सर्वोच्च न्यायालयात आरोप, निवडणूक आयोग व्हॉट्सअप कमिशन बनलेय एसआयआरच्या विरोधात मुख्यमंत्री ममता बँनर्जी सर्वोच्च न्यायालयात स्वतः हजर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात स्वतः हजर झाल्या आणि त्यांनी पश्चिम बंगालमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *