Breaking News

Tag Archives: ratnagiri

रत्नागिरीतील कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त या प्रतिष्ठित पुरस्काराची घोषणा केली होती. पर्यटन संचालनालयाचे सह संचालक स्वप्निल कापडणीस,सरपंच सचिन तोडणकर, उपसरपंच दत्ताराम भुवड, कृषी अधिकारी सुनील खरात यांनी हा पुरस्कार दिल्ली येथे …

Read More »

कोकणकरासांठी खूशखबर, गणेशोत्सवासाठी विशेष सात ट्रेन…! मुंबईतून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खूशखबर

मुंबईतून कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी खूशखबर आहे. आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन कोकण रेल्वेने एकूण सात विशेष गाड्या कोकणासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचं आरक्षण २१ जुलैपासून सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी व्यवस्था व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे …

Read More »

सिद्धार्थने या व्यक्तीला दिलेल्या वचनामुळे आजही दारुच्या थेंबालाही करत नाही स्पर्श दारुच्या व्यसनापासून दूर असल्याचं सिद्धार्थ ने सांगितलं कारण

आपल्या अभिनयामुळे नेहमीच कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. आज सिद्धार्थने मराठीसह बॉलिवूडमध्येही त्याचं स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज सगळीकडे त्याची चर्चा होते. विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा अभिनेता आजही त्याच्यातील मध्यमवर्गीयपणा जपतो. बेस्ट वसाहत मध्ये वाढलेला सिद्धार्थ आजही आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसून येतो …

Read More »

मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

पर्यटनाला चालना देण्यासाठी, पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मंत्री महाजन …

Read More »

या पाच जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी, पर्यावरण मंत्री यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार

महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत. हा आराखडा मार्गी लागल्यामुळे या पाच जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसेच खासगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील तसेच पायाभूत सुविधांच्या कामांनाही मोठा …

Read More »

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीसह १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता

रत्नागिरी येथे १०० विद्यार्थी क्षमतेसह संलग्नीत ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मागील वर्षी मान्यता देण्यात आली होती. आता रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४४८ पदनिर्मितीस मान्यता देण्यात आली असून याकरीता रु. १०५.७८ कोटी खर्चासही मान्यता देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण आणि क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी माहिती दिली. मंत्री गिरीष …

Read More »

अखेर मान्सून राज्यात धडकलाः वातावरणातल्या गारव्याने नागरिकांना दिलासा कोकणात बरसल्या मान्सूनच्या सरी

महाराष्ट्रातील प्रत्येक जण ज्या गोष्टीची गेल्या काही दिवसांपासून आतुरतेनं वाट पाहत होता. तो दिवस आज उजाडला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झालेलं आहे. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. ८ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनतर महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये मान्सून पोहोचला आहे. भारतीय हवामान …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, उद्योगमंत्री कोण? जनता म्हणाली गद्दार मी राजीनामा देतो, ४० गद्दारांनी राजीनामा देऊन निवडणुकीला यावं

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा शुक्रवारी बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघात होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरी पासून तरुणांच्या रोजगाराच्या मुद्यावरून खडेबोल सुनावले आहेत. खोके सरकारमुळे महाराष्ट्रातील तरुणांवर बेरोजगारीची वेळ आली आहे, अशी सडकून टीका करत आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री कोण …

Read More »

कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून इशारा दिला

हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोंकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती …

Read More »

अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय: व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना होणार लाभ अतिवृष्टीसह पुरबाधितांच्या कर्ज पुरवठ्यासाठी जिल्हा बँका देणार या नाममात्र व्याज दराने कर्ज

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला. आता त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार …

Read More »