Tag Archives: recruitment

चंद्रकांत पाटील यांची माहिती, सहायक प्राध्यापकांच्या ४४३५ पदांची भरती लवकरच विधान परिषदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची ४४३५ रिक्त पदे भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला. त्यावर वित्त विभागाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करुन लवकरच भरतीला गती देण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, उच्च …

Read More »

मेटा करतेय ४१ आयटी इंजिनिअर्सची भरती बेंगळुरू मधील कार्यालयासाठी करतेय विस्तार

अलिकडच्या काळात नोकऱ्या कपातीमुळे जागतिक स्तरावरील ५% कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला असला तरी, मेटा भारतात, विशेषतः बेंगळुरूमध्ये आपला विस्तार करत आहे. टेक जायंट शहरात ४१ अभियांत्रिकी पदांसाठी सक्रियपणे भरती करत आहे, ज्यामध्ये मेटाच्या डेटा सेंटरसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग आणि चिप डिझाइनवर लक्ष केंद्रित केले आहे. मेटाने गेल्या महिन्यात लिंक्डइनवर अनेक …

Read More »

प्रकाश आबिटकर यांची माहिती, दोन हजार पदनिर्मितीसाठी शासनाची मान्यता राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इ. आरोग्य संस्थामध्ये निर्माण होणार दोन हजार पद निर्मिती

राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक सक्षम करण्यासाठी विभागांतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील उपकेंद्र स्तरापासून ते जिल्हा रुग्णालय अशा आरोग्य संस्थांमध्ये शासनाने दोन हजार ७० पदनिर्मितीसाठी मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे. पुढे बोलताना प्रकाश …

Read More »

ग्रामीण डाक सेवक पदाची २१ रिक्त पदांसाठी भरती; इच्छुक उमेदवारांनी ३ मार्च पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत.  पात्र व इच्छुक उमेदवारांनी  ०३ मार्च, २०२५ पर्यंत व त्यापूर्वी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन नवी मुंबई विभाग, वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीद्वारे करणे …

Read More »

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीच्या संधी १७२ पदांसाठी दोनच दिवस राहिले अर्ज भरण्यासाठी

बँक ऑफ महाराष्ट्र १७२ रिक्त जागा भरण्यासाठी व्यवस्थापकीय पदांसाठी अर्ज मागवत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. नोंदणी कालावधी २९ जानेवारी रोजी सुरू झाला आणि १७ फेब्रुवारी २०२५ रोजी संपेल. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेच्या तपशीलांसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पहावी. निवड प्रक्रियेमध्ये लेखी चाचणी (आवश्यक असल्यास) आणि …

Read More »

सामाजिक न्याय विभागाच्या रिक्त पदाच्यासाठीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर ४ मार्चे ते १९ मार्च या कालावधीत ऑनलाईन परिक्षा होणार

सामाजिक न्याय विभागांतर्गत समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. या भरती प्रक्रियेचे ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. कॉम्प्युटरबेस ऑनलाईन परीक्षा ४ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५ रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली …

Read More »

रेल्वे बोर्डाने या पदासाठीच्या नोकर भरतीत शिक्षणाची अट केली शिथील फेब्रुवारी पर्यंत करता येणार नोकरीसाठी अर्ज

रेल्वे बोर्डाने भारतीय रेल्वेमध्ये लेव्हल-१ (पूर्वी गट डी) भरतीसाठी शैक्षणिक पात्रता निकष सुलभ केले आहेत. सुधारित नियमांनुसार, ज्या उमेदवारांनी इयत्ता १० वी उत्तीर्ण केली आहे, आयटीआय ITI डिप्लोमा धारण केला आहे किंवा राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (एनसीव्हीटी NCVT) द्वारे जारी केलेले राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (एनएसी NAC) आहे ते आता अर्ज …

Read More »

मंत्री जयकुमार रावल यांचे आदेश, राजशिष्टाचार विभागातील रिक्त पदे भरा वखार महामंडळाने शेतमाल साठवणूक क्षमता वाढवावी

वखार महामंडळ साठवणूक केलेल्या शेतमालाचा विमा उतरवून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये सवलत देते. ही सुविधा निश्चितच शेतकऱ्यांच्या लाभाची आहे. शेतकरी हिताच्या सुविधा देणाऱ्या वखार महामंडळाने गोदामांचा विस्तार करून साठवणूक क्षमतेत वाढ करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन व …

Read More »

मुंबईमधील होमगार्डच्या २७७१ रिक्त जागा भरणार १० जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरूष व महिला होमगार्डच्या २७७१ जागा भरण्यात येणार आहे. यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी १० जानेवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येत आहे. होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक, नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज …

Read More »

सैनिक कल्याण विभागाकडून कंत्राटी तत्वावर या पदासाठी मागविले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण विभागाकडून आवाहन

सैनिकी मुलींचे वसतिगृह कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधिधिका पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी १५ जानेवारी, २०२५ रोजीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रां.प्र.जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. या पदासाठी अर्जदार ही युध्द विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या …

Read More »