Tag Archives: shivsena

राज्य मंत्रिमंडळातील १० वे मंत्री कोरोना पॉझिटीव्ह ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळातील मंत्री राज्यमंत्री कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात आता शिवसेनेचे सर्वाधिक कार्यक्षम म्हणून लौकिक असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची कोरोना चाचणी आज पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी आज स्वत: ट्विटरवरून दिली. आतापर्यंत राज्य मंत्रिमंडळातील अशोक चव्हाण, डॉ.जितेंन्द्र आव्हाड, हसन मुश्रीफ, डॉ.नितीन राऊत, …

Read More »

उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा ! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्याना टोला

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे ६,००,००,०००  रुपयांचे टेंडर काढले. राज्य सरकारला असे वाटत आहे की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करावे …

Read More »

महाविकास आघाडीविरोधात भाजपाची राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणत असल्याची भाजपाचे विनय सहस्त्रबुध्दे यांच्यासह तीन खासदांराचे पत्र

मुंबई : विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून डिसेंबर २०१९ पासून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि प्रसारमाध्यमांच्या फ्रिडम् ऑफ स्पीच या संकल्पनेवर गदा आणली जात आहे. तसेच राज्यात राज्य सरकार पुरस्कृत गुंडागर्दी सुरु असल्याचा मुद्दा उपस्थित करत मानवी हक्क आयोगाने यासंदर्भात लक्ष घालावे अशी मागणी भाजपा नेते तथा खासदार विनय सहस्त्रबुध्दे, …

Read More »

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांनी निवडणूक का‌ळात ३ वेळा माहिती प्रसिध्द करणे बंधनकारक उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या सुधारीत सूचना जारी

नवी दिल्ली- मुंबई : प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी तसेच राजकीय पक्षांनी अशा उमेदवारांचे नामनिर्देशन करण्याबाबत १० ऑक्टोबर २०१८ व ६ मार्च २०२० रोजी तपशीलवार सूचना निर्गमित केल्या आहेत.या अनुषंगाने आयोगाने ११ सप्टेंबर, २०२० रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा केली. संबंधित उमेदवार आणि त्यांना उमेदवारी देणारे राजकीय पक्ष यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी यासंदर्भातील सूचना आणखी स्पष्ट …

Read More »

निवृत्त नौदल अधिकारी शर्मा मारहाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी भाजपा आ. अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखाविरोधात कारवाई करण्याचे नाटक ठाकरे सरकार कडून करण्यात आले होते. या विरोधात अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात व विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचे आधी ट्विट आणि मग बिहारमध्ये जावून शिवसेनेवर टीका माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण

बिहार-मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कार्टून व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केल्याप्रकरणी नौदलातील निवृत्त अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी केलेल्या कथित मारहाणप्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून राज्यपुरस्कृत दहशवाद थांबविण्याचे आवाहन करत हे निषाधार्ह असल्याची टीका त्यांनी बिहारमध्ये जावून केली. बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांची बिहारच्या प्रभारी पदी भाजपाने नियुक्ती केली. त्यामुळे …

Read More »

शिवसेनेचे डॅमेज रोखण्यासाठी पुन्हा एकदा शरद पवारच कंगना प्रकरणाशी राज्य सरकारचा संबध नाहीच

नवी दिल्ली : प्रतिनिधी मुंबई आणि महाराष्ट्राला दूषण देणाऱ्या कंगना राणावत हिच्या ट्विटरवरील वक्तव्यांना जाब विचारण्याच्या नादात सुरू झालेल्या राजकारणामुळे शिवसेनेचे डॅमेज व्हायला लागले. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेच्या डॅमेज कंट्रोलसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि आघाड़ीचे कर्तेकरविते शरद पवार यांनी पुढाकार घेत मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईशी …

Read More »

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती, मात्र आरक्षण मिळण्याची आशा मोठ्या खंडपीठासमोर होणार सुणावनी

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नसल्याचे सांगत आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली. मात्र हा खटला मोठ्या खंडपीठासमोर चालविण्यासाठी वर्ग करण्यात येणार असल्याचा निर्णय दिल्याने मराठा आरक्षणाबाबत आणखी …

Read More »

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे भाजपाच्या भाई गिरकर यांची माघार

मुंबई : प्रतिनिधी विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  विधानपरिषदेत त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. उपसभापती पदासाठी भाजपाचे विजय भाई गिरकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु त्यांनी माघार घेतल्याने गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली. महिलांचे प्रश्न सोडविण्यास नीलमताई यांचे कायम …

Read More »

परीक्षा घेण्याचा शिक्षण मंत्र्यांचा निर्णय म्हणजे ‘चटावरचे श्राद्ध’ उरकण्यासारखे भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने ना इलाजाने घेतला. परंतु परीक्षा अहवालातील शिफारसींबाबत कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवण्यात आले व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही युवराजांचा अहंकार जपण्यासाठी थातुरमातुर परीक्षा घेण्याचे नाटक केले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे …

Read More »