मुंबई : प्रतिनिधी मागील ४०-४५ वर्षे शिवसेनेसाठी काम करत आहे. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी समर्थपणे आणि यशस्वीतेने पार पाडली. आता सत्तेत आल्यानंतर पक्षात काल परवापर्यंत आलेल्या नवख्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. त्यातच आता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी प्रशासनातील व्यक्तीवर सल्लागाराची जबाबदारी सोपविल्याने पक्षप्रमुखांचाच पक्षा नेते-कार्यकर्त्यांवर विश्वास नाही का? असा सवाल शिवसेनेतील …
Read More »कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जातेय, मृतकांच्या संख्येत पारदर्शकता नाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विरोधी पक्षनेते फडणवीसांनी केली लक्ष देण्याची मागणी
मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेलीय. ऑक्सीजन न मिळाल्यामुळे कोरोनारूग्णांचा मृत्यू ही त्याचेच द्योतक असून आजही या विषाणूमुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत अजूनही पारदर्शकता नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत या गोष्टींकडे लक्ष देण्याची मागणी आज पत्र पाठवित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. १९ जून २०२० रोजी …
Read More »आघाडीची तीन माणसं रडली की बोलली? आता रडून नाही, करुन दाखवा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी आघाडीची “तीन माणसं” बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थांबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा, रडू नका, अशा शब्दांत भाजपा नेते माजी …
Read More »केंद्र सरकार राज्याचे पैसे देत नाही मात्र कोणतीही गोष्ट फुकट देत नाही शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री अनिल परब यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी केंद्राकडे महाराष्ट्राचे ४२ हजार कोटी पडून आहेत. ते पैसे द्या म्हणून मागणी करतोय तर ते दिले जात नाहीत. ८० ट्रेन मागितले तर ३० ट्रेन दिल्या जातात. एक तास आधी ट्रेन उपलब्ध असल्याचे रेल्वेकडून सांगत नुसता गोंधळ निर्माणण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब करत …
Read More »आता रेड झोनमध्येही मिळणार या सवलती राज्य सरकारकडून सुधारीत मार्गदर्शक तत्वे जाहीर
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र या कालावधीत सुरुवातीला रेड झोनमधील व्यवहाराला बंदी घालण्यात आली होती. मात्र आता काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या सवलतींची अंमलबजावणी २२ मे पासून ३१ मे पर्यंत करण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात …
Read More »कोरोनाकाळासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला ८ कलमी कार्यक्रम कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थितीबाबत शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा
मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती, आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज चर्चा केली. यामध्ये वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग अशा विविध विषयांवर शरद पवार यांनी सूचना मांडल्या. १) कोविड-१९ व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे …
Read More »बिनविरोध निवडणूकीचे ठरलेले असताना मग दोघांचे अर्ज का? भाजपाच्या दोन उमेदवारांचे अर्ज आणि मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना फोन
मुंबई: विशेष प्रतिनिधी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी ठरलेले आहे. मात्र आज सोमवारी भाजपाच्या दोन डमी उमेदवारांनी अर्ज भरताच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन करत आपले बिनविरोध निवडणूकीचे ठरलेले असताना दोन उमेदवारांचे अर्ज कशासाठी? असा सवाल केल्याची …
Read More »आमदारांनो तुमच्या लक्षवेधी, तारांकित प्रश्न पाठवा, पण ऑनलाईन विधानमंडळाकडून अधिवेशनासाठी सदस्यांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे संकट असले तरी विधिमंडळाकडून कायदेशीर गोष्टींची पूर्तता करण्यासाठी तसेच आगामी पावसाळी अधिवेशन तयारीचा भाग म्हणून विधान परिषदच्या आमदारांना तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना आदी गोष्टी विधानमंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने पाठविण्याची विनंती केली. तसेच ही प्रश्न, लक्षवेधी ११ मे रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यतच पाठविण्यास सांगितले. महाराष्ट्र विधानपरिषद …
Read More »मुख्यमंत्र्यांसह महा आघाडीचे ५ आणि भाजपाचे ४ उमेदवार रिंगणात काँग्रेसमधून खान, सावंत, हुसेन तर भाजपातून तावडे, मुंडे यांच्या नावाची चर्चा
मुंबई: प्रतिनिधी राज्यात राजकिय स्थिरता आणण्याच्या उद्देशाने विधान परिषदेची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. या निवडणूकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विद्यमान उपसभापती अॅड.नीलम गोऱ्हे यांची नावे निश्चित सांगण्यात येत आहेत. तर काँग्रेसकडून दोन उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे पाच उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. भाजपाकडून चार …
Read More »राज्यातील सर्वांवर मोफत उपचार : खाजगी रूग्णालयांच्या मनमानीस लगाम महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची जनतेला आरोग्यदायी भेट
मुंबई: प्रतिनिधी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज महाराष्ट्र दिनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहिर करत राज्यातील नागरिकांना मोफत व कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना मुंबईतील काही …
Read More »
Marathi e-Batmya