Tag Archives: shivsena

युती सरकारला मदत करण्यासाठी १५ बंडखोर संपर्कात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीच्या निकालावर आता काही बोलणार नाही. त्याचे विश्लेषण नंतर करणार आहे. मात्र राज्यात पुन्हा युतीचे सरकार स्थापन करण्याइतके संख्याबळ भाजपा-शिवसेनेला मिळाले आहे. तरीही आमच्याविरोधात बंडखोरी करून विजय मिळविलेल्या १५ बंडखोर विजयी उमेदवारांकडून सरकार स्थापनेसाठी मदत करणार असून ते संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निकालानंतर संध्याकाळी भाजपा …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणतात, भाजपाबरोबर फॉर्म्युल्यानुसार पुढे जाणार आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

मुंबईः प्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या निकालाने राज्यातील सरकार स्थापनेसाठी शिवसेनेची मदत घेण्याशिवाय भाजपाला पर्याय राहीला नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीवेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार पुढे जाणार असल्याचे स्पष्ट केल्याने ठाकरे घराण्याचा वारस असलेल्या आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात कोणीही सत्तेवर आले तरी …

Read More »

भाजपा-सेनेच्या सत्ता उन्मादाला जनतेने नाकारले विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुंबईः प्रतिनिधी या निवडणुकीत दिसलं की भाजप – सेनेच्या लोकांचा सत्तेचा उन्माद जनतेला पसंद पडला नाही.मुळात जमिनीवर पाय ठेवून चालले की, त्यांचे स्वागत होते. परंतु त्यांनी सीमा ओलांडली होती अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली. विधानसभा निवडणूकांचे निकाल दुपारपर्यंत स्पष्ट झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »

वरळीत सेनेचा तर मातोश्रीच्या अंगणात काँग्रेस झेंडा वांद्रे पूर्व मध्ये सेनेच्या उमेदवाराचा पराभव करत काँग्रेसचे झीशान सिध्दीकी विजयी

मुंबईः प्रतिनिधी राज्याची संपूर्ण लक्ष वेधून राहीलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे युवानेते तथा ठाकरे घराण्याचे वारसदार आदित्य ठाकरे यांनी विजय मिळवित आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले. मात्र ठाकरे कुटुंबिय रहात असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघ मात्र यंदा शिवसेनेला राखता आला नाही. या परिसरात काँग्रेसचे झीशान सिध्दीकी यांनी विजय मिळविल्याने शिवसेनेला स्वतःचा …

Read More »

नालासोपाऱ्यात प्रदीप शर्मा पिछाडीवर क्षितीज ठाकूर विजयाच्या उंबरठ्यावर

मुंबईः प्रतिनिधी चकमेकफेम माजी पोलिस अधिकारी प्रदिप शर्मा हे निवडणूकीच्या रिंगणात उतरून राजकारणात आपले नशीब अजमावत होते. परंतु त्यांना पोलिसीगिरीतील दंबगशाही काही राजकारणात सध्यातरी दाखविता आली नाही. त्यांना ३६ हजार ७८० मते मिळून पिछाडीवर आहेत. तर तेथील विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांना ५९ हजार ९१३ मतांनी आघाडीवर असून त्यांचा विजय …

Read More »

मतमोजणीच्या कामासाठी पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या २४ रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली. मतमोजणी उद्या सकाळी ८ वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व …

Read More »

बंडखोरीमुळे भाजपा-शिवसेनेच्या २८ हून अधिक जागांमध्ये घट होण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल काही तासानंतर जाहीर होणार आहे. तत्पूर्वी या निवडणूकीत भाजपा आणि शिवसेनेने परस्पराविरोधात बंडखोरी करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा देत त्यांच्या उमेदवारांच्या विजयाची हमी घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीचा निकाल अनपेक्षित लागणार असल्याची शक्यता अधिक असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील वांद्रे पश्चिम, माण, मीरा-भाईंदर, …

Read More »

प्रचार थंडावला… शेवट दिवशी भाजपा, राष्ट्रवादी,काँग्रेस, मनसेकडून प्रचारात आघाडी

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीकरीता ऑक्टोंबर महिन्यात सुरु झालेला प्रचार आज संध्याकाळी ६ वाजता संपला. मागील २० ते २५ दिवस भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेने चांगलाच राजकिय धुराळा उडवून दिला. मात्र खऱ्या लढतीचे चित्र भाजपा विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस असेच प्रचारात दिसून आले. भाजपाकडून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »

थांबा, सरकारी नोकरदार, शिक्षकांच्या पगारीसाठी पैसा गोळा करायचाय तिजोरीत खडखडाट असल्याने श्रीमंत संस्थांकडून पैसे घेण्याच्या हालचाली सरकारकडून सुरु

मुंबईः विशेष प्रतिनिधी दसरा गेला दिवाळी आली तरी देशावर मंदीचे सावट असल्याने अनेक औद्योगिक कारखाने एकाबाजूला बंद पडत आहेत. तर दुसऱ्याबाजूला बँकामधील व्यवहार आणि बाजारात खरेदी-विक्रीला थंडा प्रतिसाद मिळत आहे. या मंदीमुळे तिजोरीतही पैसा जमा होईनासा झाल्याने सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना दिवाळीपूर्वी पगार देण्यासाठी सरकारच्या अखत्यारीतील संस्था आणि रिझर्व्ह बँकेकडून …

Read More »

शिवसेना-भाजपाच्या प्रचारातून केंद्रीय मंत्री अरविंद सावंत गायब? दक्षिण मुंबईतील सेना-भाजपाच्या उमेदवारांच्या जाहीरात फलकात फोटो दिसेना

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीत शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अरविंद सावंत हे शिवसेना-भाजपा उमेदवारांच्या प्रचारातून गायब झाले आहेत. तसेच युतीच्या उमेदवारांच्या कोणत्याच फलक आणि जाहीरातीमध्ये त्यांचा फोटो वापरला जात नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. केंद्रात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार आहे. तसेच …

Read More »