Tag Archives: shivsena

शिवसेनेच्या तीन तर भाजपच्या एका जागेच्या विजयाची औपचारीकता बाकी विलास पोतनीस, कपिल पाटलांच्या विजय जवळपास निश्चित

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदार संघात, कोकण शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकीत शिवसेनेला तीन जागांवर विजय मिळल्याचे सांगण्यात येत आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत कपिल पाटील आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे आघाडीवर असल्याची माहिती संध्याकाळ पर्यंत हाती आली असून या जागांच्या विजयाची …

Read More »

नाणार प्रकल्प करारप्रश्नी शिवसेनेचा मंत्रिमंडळ बैठकीत निषेध गुरूवारी मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या मंत्र्यामध्ये होणार चर्चा

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळे शिवसेनेचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जमिन अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केली. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर केले. तरी राज्य सरकारने नाणार प्रकल्पासाठी आखाती देशातील तीन कंपन्यांशी करार केला. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे …

Read More »

शिवसेनेसाठी फंड गोळा करण्यासाठीच प्लास्टीक बंदी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकांसाठी प्लास्टिक उत्पादक व्यापाऱ्यांकडून निवडणूक फंड गोळा करण्यासाठी प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतल्याचे अशी बोचरी टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावर केली. प्लॅस्टिकबंदीचा निर्णय हा सरकारचा आहे की एका खात्याचा आहे हे स्पष्ट होत नाही. मुख्यमंत्री …

Read More »

मुंबई महापालिकेच्या विकास आराखाड्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप चिंताजनक शिवसेना मंत्र्यासह खासदार, आमदारांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुंबईः प्रतिनिधी राज्य सरकार मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत असून स्थानिक स्वराज्य संस्थांना दुबळे करण्याचा प्रयत्न करीत असल्याबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे. हरकती आणि सूचनांसाठी विकास आराखडा मराठीतून उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते,पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात युतीबाबतची चर्चा फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबतच सेनेतील अन्य नेत्यांना महत्व नाही

मुंबई : प्रतिनिधी पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत आणि विधान परिषदेच्या निवडणूकीत भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी टोकाची टीका करूनही शिवसेनेबरोबर युती करण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली आहे. तसेच आगामी निवडणूकीच्या निमित्ताने फक्त उध्दव ठाकरे यांच्यासोबतच चर्चा करणार असल्याचे सांगत शिवसेनेचा कोणताही नेता काहीही बोलत …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच मोठे खिंडार माजी मंत्री छगन भुजबळ, गणेश नाईक आणि भास्कर जाधव यांचा लवकरच शिवसेनेत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी देशातील लोकसभा निवडणूकांना एक वर्ष तर विधानसभेच्या निवडणूकांना दिड वर्षे अद्याप राहीलेली असतानाच सर्वच राजकिय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची आणि नेत्यांची पळवा पळवी सुरु केली आहे. या पळवा पळवीत आता शिवसेनेने पुढाकार घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, नवी मुंबईतील वजनदार नेते गणेश …

Read More »

भाजप-शिवसेनेला पालघर जिल्ह्याचा विकास नाही, जमिनी हव्या आहेत निवडणुकीत शिट्टीही चालणार नाही आणि दमदाटीही चालणार नसल्याचे अशोक चव्हाण यांचा टोला

पारोळा : प्रतिनिधी वसई, विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील ठोकशाही मोडीत काढून लोकशाही आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं जनता दल सेक्युलर व मित्रपक्षांचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना विजयी करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी करत भाजप-शिवसेनेला पालघरमधील विकासात रस नसून फक्त इथल्या जमिनीत रस असल्याचा आरोप त्यांनी …

Read More »

भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी तीन जागांचे भवितव्य पेटी बंद विधान परिषदेसाठी ९९.८१ टक्के मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण येणाऱ्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. या सहा जागांवर भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी तीन उमेदवार उभे करण्यात आले. त्यामुळे तीन जिल्ह्यांच्या एका मतदारसंघानुसार तीन मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यातच या निवडणूकीकरीता ९९.८१ टक्के मतदान झाले. त्यामुळे या …

Read More »

लोकभारतीच्या कपिल पाटील यांच्या विरोधात शिवाजी शेडगे मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे शेंडगे यांना उमेदवारी

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई शिक्षक मतदारसंघ  निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे शिवाजी शेंडगे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लोकभारती आणि जनता दलचे आमदार कपिल पाटील यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे. शिवाजी शेंडगे हे पेशाने शिक्षक असून गेली १८ वर्षे चारकोपच्या एकविरा विद्यालयात जुनिअर कॉलेजमध्ये …

Read More »

मिठागरांच्या जमिनी विकासकांच्या घशात घालाल तर सहन करणार नाही शिवसेनेच्या मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत विरोध

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारमधील भाजप-शिवसेनेमधील दरी मोठ्या प्रमाणावर वाढत असून नाणार प्रकल्पानंतर आता मुंबईतील मिठागरांच्या जमिनींच्या अनुषंगाने शिवसेनेने विरोध दर्शविला असून  परवडणा-या घरांच्या नावाखाली मिठागरांच्या जमिनी विकासकांच्या घशात घालाल तर ते आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच मुख्यमंत्री …

Read More »