वेदांत-फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबस सारखा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. आज शनिवारी दुपारी आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली. राज्यातील प्रकल्प बाहेर जात असताना मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांचा राजीनामा …
Read More »अंधेरी पूर्व निवडणूकीच्या प्रचाराचा उद्या शेवटचा दिवस, ही बंधने लागू होणार
मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवार १ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू होण्यासह विविध निर्बंध देखील लागू होत आहेत; या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या सूचनांचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे, …
Read More »आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल, नेत्यांची सिक्युरिटी काढा पण तरूणांना रोजगाराची द्या
शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. घटनाबाह्य सरकारवर उद्योजकांचा विश्वास नाही हे सरकार अस्थिर आहे. नेत्यांची सिक्युरिटी काढा पण तरुणांना रोजगाराची सिक्युरिटी द्या, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्यात परतीच्या पावसामुळे …
Read More »भाजपा सवाल, औरंगजेबी अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी घेतली का?
मराठी माणसावर कब्जा करण्याचे स्वप्न पाहतच औरंगजेब गाडला गेला, परागंदा झाला तेच औरंगजेबी अपुर्ण स्वप्न आज पुर्ण करण्याची जबाबदारी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतली आहे काय ? असा कडवा सवाल करीत भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी करत जोरदार तोफ डागली. मुंबई भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार ॲड …
Read More »उदय सामंत यांचा पलटवार, एअरबस प्रकल्प बाहेर जाण्यास महाविकास आघाडी जबाबदार
एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला राज्याचे शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पलटवार करत हा प्रकल्प जाण्यास महाविकास आघाडी सरकारलाच जबाबदार धरले असून महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतानाच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नव्हता असा गौप्यस्फोट केला. विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर …
Read More »आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांना वेदांताबाबत आणि या प्रकल्पाबाबतही माहिती नाही
परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राजकारण चालूच राहील मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीवर लक्ष देणे गरजेचे आहे. चार प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले. घटनाबाह्य सरकारमधील मंत्र्यांनी वेदांता प्रकल्प परत आणू सांगितले तसेच एअर बस प्रकल्प आणूच. परंतु वेंदांता बद्दल जस माहिती नव्हतं तसचं एअर बस बद्दल त्यांना माहिती नाही …
Read More »आदित्य ठाकरेंचा टोलाः गद्दारांनी खोके स्वतःला ठेवले, मदतीसाठी दिले नाहीत
राज्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. शेतीच्या शेती वाहून गेलेली असताना राज्य सरकार मात्र उत्सवांमध्ये व्यस्त आहे. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. अशातच शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे …
Read More »अरविंद सावंतांचा सवाल, निवडणूक आयोग बंद असताना त्या बातम्या कशा आल्या?
मागील तीन-चार दिवस दिवाळीची सुट्टी असताना सर्वच प्रसारमाध्यमांमध्ये शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या ८.५० लाख प्रतिज्ञापत्रे फॉलमेटनुसार नसल्याने रद्द झाल्याचे वृत्त प्रसारीत झाले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याचे चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी यासंदर्भात सर्वच प्रसारमाध्यमांना …
Read More »ऐन दिवाळीत ठाकरे गटाचे किर्तीकर आणि शिंदे गटाच्या कदम यांची भेट
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जण बाहेर पडले. त्यानंतर भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे स्वत: ठाकरे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांची भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर ऐन दिवाळीची धामधुम …
Read More »भास्कर जाधव म्हणाले, आनंदाचा शिधा म्हणजे कुचेष्टाच
आधीच महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे अंत्योदय आणि केशरी कार्डधारकांना ही दिवाळी गोड करता यावी, यासाठी रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र अनेक ठिकाणी या वस्तू पोहचल्याच नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा ही सामग्री मिळाली नसल्याने विरोधकांकडून …
Read More »
Marathi e-Batmya