Tag Archives: shivsena

मुख्यमंत्र्यांनी आघाडीतील सहकारी पक्षांबरोबरच विरोधकांना केले हे आवाहन जनतेचे आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू, कोरोना संसर्गातील वाढ परिस्थिती बिघडवू शकते

मुंबई: प्रतिनिधी कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा ,मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या …

Read More »

पवारांनी कानपिचक्या देत केंद्राच्या कृषी धोरणाबाबत म्हणाले… आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय

मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच या दरम्यान एकमेंकाना “पाठीत खंजीर खुपसला”, “कोथळा बाहेर काढणारे” अशा शब्दांचा वापर सुरु झाल्या आहेत. त्यातच काल जुन्नर मध्ये संजय राऊत यांनी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर टोकाची टीका …

Read More »

अरे हे मंत्रिमंडळ आहे की,…. आमचं राष्ट्रवादीबद्दल काहीही म्हणणं नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका

पुणे : प्रतिनिधी राज्यातील एक मंत्री ईडीच्या रडार आहे, एक मंत्री पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राजीनामा देवून बाहेर फिरतोय, एकजण करूणा मुंडे प्रकरणात मान खाली घालून फिरतोय, एका मंत्र्याबद्दल लूक ऑऊट नोटीस जारी झालीय, तर एकजण ईडी कारवाईपासून पळतोय, तर या सर्वांचे जे सगळं चालवितात त्या वाजेंद्र राऊतांचा बंगला पाडण्यात …

Read More »

पुणे-पिंपरी चिंचवडसह राज्यातील २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे-नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच राज्यातील ज्या महापालिकांनी या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप सुरु केली नाही त्यांना पत्र पाठवून यासंदर्भातील अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका …

Read More »

पनवेलकरांसाठी खुषखबर: रहिवाशांची दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून होणार सुटका सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेकडे

मुंबई : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना दुहेरी मालमत्ता कराच्या जाचातून  सोडवण्यासाठी सिडको प्राधिकरणाकडून पुरवल्या जाणाऱ्या नागरी सेवा पुढील दोन महिन्यात पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानंतर फक्त महापालिकेला कर आकारणीचे अधिकार मिळणार असल्याने दुहेरी कराचा मुद्दा कायमस्वरूपी निकाली निघेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. …

Read More »

आघाडी सरकारच्या विनाशी कारभारामुळे राज्य आर्थिक अधोगतीच्या दिशेने भाजपा आ. अतुल भातखळकर यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी आघाडी सरकारच्या काळात उद्योजकांना खंडणीसाठी मारहाण करणे, धमक्या देणे असे प्रकार सर्रास घडू लागल्याने उद्योगधंदे अन्य राज्यात स्थलांतरीत होऊ लागले आहेत. याचाच परिणाम राज्याच्या जीएसटी उत्पन्नात मोठी घट होण्यात झाला आहे. आघाडी सरकारचा विनाशी कारभार असाच चालू राहिला तर राज्य आर्थिक अधोगतीकडे जाईल, अशी टीका भाजपाचे आ. अतुल भातखळकर …

Read More »

निर्बंध शिथीलीकरणासाठी शिवसेना खासदाराच्या जावयाकडून थिअटर मालकांशी वाटाघाटी! गोविंदा काय लादेन आहेत का? आशिष शेलार यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे, वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात, जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले “वाटघाटी” झाल्या. वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते.  राज्यातले थिअटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीतला एक राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो …

Read More »

अनिल परबांनी ईडीला सांगितले आज नाही १४ दिवसांनी येतो नेमकं कोणत्या प्रकरणावरून बोलाविले याची माहिती नाही

मुंबई: प्रतिनिधी भाजपाच्या जन आर्शिवाद यात्रेचा समारोप झाल्यानंतर संध्याकाळी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने २९ ऑगस्ट रोजी नोटीस बजावत मंगळवारी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र अनिल परब हे ईडी कार्यालयात आज पोहचले नाहीत. तसेच त्यांनी चौकशीला हजर होण्यासाठी १४ दिवसांची मुदत मागितली असून तशी मुदत …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत सरनाईकांच्याबाबत हे सांगितले चांगल्या कामासाठी निधी मिळाला आहे येथून पुढेही मिळेल

मुंबई : प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात थोडेसे बाजूला फेकल्या गेलेल्या आणि ईडींच्या कारवाईमुळे त्रस्त झालेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे आज मुख्यमंत्र्याननी कौतुक करत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच नाईक यांना यापुढेही निधी देवू असे सांगत सेना अंतर्गत राजकारणात नाईक हे डावलले …

Read More »

परब यांच्या नोटीसप्रकरणावरुन राष्ट्रवादीचे भाजपावर टीकास्त्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मलिक यांचे भाजपावर आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना ईडीने पाठविलेल्या नोटीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात जे काही घडतंय ते …

Read More »