राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टीचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपल्या मुख्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक असताना देखील एस टी महामंडळाच्या २५१ पैकी ३४ आगारातील आगरप्रमुख हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे एका गोपनीय अहवालामध्ये निष्पन्न झाले आहे. हि अत्यंत गंभीर बाब असून, बेजबाबदार वर्तन करुन आपल्या कर्तव्यात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या …
Read More »एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींचा त्वरित वापर करण्यास मान्यता परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांची माहिती
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी. महामंडळ) ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सार्वजनिक -खाजगी भागिदारीतुन विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत ही ६० वर्षावरून ९८ वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन …
Read More »एसटी महामंडळाने जाहिर केली श्वेतपत्रिका, ४५ वर्षात फक्त ८ वर्षे नफ्यात येत्या ४ वर्षात एसटीला फायद्यात आणणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
गेली अनेक वर्षे सातत्याने तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला येत्या ४ वर्षात फायद्यात आणण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस टी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करताना बोलत होते. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर तसेच सर्व खात्याचे …
Read More »अखेर एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती आयएएस अधिकाऱ्याकडून एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद काढून मंत्र्यांकडे सुपुर्द
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपामध्ये कुरबुरी वाढल्या होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद राज्याच्या परिवहन मंत्र्यांकडे राहत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदी स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. …
Read More »एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पीएफ पैशांवरून अनिल परब आणि प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी कामगारांचा संप झाला तरी पगारवाढ दिली
मागील अनेक वर्षापासून राज्यातील एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती बिघडलेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कितीही नफ्यात आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात आला तरी एसटी महामंडळ काही केल्या फायद्यात येताना दिसत नाही. त्यातच एसटी महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची पैसे पीएफच्या कार्यालयात जमाच केले नसल्याची बाब उघडकीस आली. त्यावरून …
Read More »क्रेडाई ने एसटीची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे..! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन
राज्यभरात पसरलेल्या एसटीच्या १३६० हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रीडाई (CRDAI) या संस्थेने आपला योगदान द्यावे. असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज ने भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देते प्रसंगी बोलत होते. प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्यभरात ८४२ ठिकाणी १३६० हेक्टर …
Read More »दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या ५ हजार लालपरी बसेस खरेदी करणार एस टी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक …
Read More »एसटीला नोव्हेंबर मध्ये ९४१ कोटी रुपये इतके विक्रमी उत्पन्न…. तिकीट दरवाढीला मान्यता द्या- सरकारकडे एसटीचा प्रस्ताव
दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी …
Read More »एसटी महामंडळाचा मोठा निर्णयः २०१९ च्या भरतीच्या यादीतील उमेदवारांना घेणार १०५८ उमेदवारांना सामावून घेणार-एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांची माहिती
सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. सन २०१९ च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना …
Read More »उत्पन्न वाढीसाठी एसटीच्या चालक-वाहकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता एसटी महामंडळाचा अभिनव उपक्रम
प्रवासी वाहतूक करीत असतांना महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक व वाहक यांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करुन अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून …
Read More »
Marathi e-Batmya