Tag Archives: transport minister

प्रताप सरनाईक यांची माहिती, दरवर्षी सुमारे ३०० मेगॅवॅट वीजनिर्मितीचे लक्ष एसटीच्या मोकळ्या जागेवर ' सौर ऊर्जा प्रकल्पा ' उभारुन एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार

एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तसेच कार्यशाळेच्या व बसस्थानकांच्या छतावर ‘ सौरऊर्जा प्रकल्प ‘ उभारुन त्याद्वारे वर्षाला सुमारे ३०० मेगावॉट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष ठेवण्यात आले असून त्याद्वारे वर्षाला सुमारे १ हजार कोटी रुपये किंमतीची वीजनिर्मिती करण्याचा महत्वकांक्षी ‘ सौर ऊर्जा हब ‘ उभारुन एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार असल्याची परिवहन …

Read More »

प्रताप सरनाईक यांचा इशारा, मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही… मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

एसटी ही महाराष्ट्राची ‘ लोकवाहिनी ‘ आहे . दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासी सेवेचा लाभ घेतात. त्यांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणे हे एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्याला …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, ‘ सुजाता मडके ‘ या शहापूरच्या कन्येची “इस्रो”मध्ये थरारक झेप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले अभिनंदन

“यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते” या शब्दात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या मोटार परिवहन विभागात वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शहापूर तालुक्यातील शिरगाव (जि. ठाणे) येथील सुजाता रामचंद्र मडके हिचे अभिनंदन केले …

Read More »

प्रताप सरनाईक यांचा स्लीपर(शयनयान ) बस प्रवाशांसाठी सुरक्षा इशारा “सजग प्रवासी, सुरक्षित प्रवास” कुर्नूल दुर्घटनेनंतर राज्य परिवहन महामंडळाची जनजागृती मोहीम सुरू

आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे नुकतेच स्लीपर बसला लागलेल्या आगीत २० प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने म्हणजे एसटी महामंडळाने “शयनयान वाहन प्रवासी सुरक्षा मार्गदर्शन” अभियान सुरू केले …

Read More »

महाराष्ट्र सरकारचे “मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५” जाहीर ओला-उबर, रॅपिडोसह सर्व ॲप आधारित सेवांसाठी नवे मानक ठरवले जाणार! -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५” या मसुदा नियमांची घोषणा केली आहे. हे नियम मोटर वाहन कायदा, १९८८ च्या कलम ७३, ७४ आणि ९३ अंतर्गत प्रस्तावित असून, १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या हरकती …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आदेश, अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या विक्रेत्यांचे ‘ट्रेड प्रमाणपत्र’ रद्द करणार ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीत दिले आदेश

राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना (मल्टी ब्रँड आउटलेट) विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ‘ट्रेड प्रमाणपत्र’  रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले. ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्या …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु सेवा वर्गातील लवचिकता

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार असल्याची माहिती माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, या …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती रिक्षा व ई बाईक धोरण नियमावली दोन दिवसात प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवून ॲप आधारित टॅक्सी संस्थांनी व्यवसाय करावा

ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक टॅक्सीसाठी समुच्चयक धोरण नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होत असून त्यामध्ये प्रवासी आणि चालकांच्या अनेक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात ॲप आधारित टॅक्सी, रिक्षा व ई-बाईक सेवा पुरविणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना  प्रवासी व चालकांना  केंद्रस्थानी ठेवावे. नफा कमविण्याच्या प्रयत्नात त्यांची आर्थिक लुबाडणूक करून व्यवसाय वृद्धी करु नये, अशा सूचना परिवहन …

Read More »

प्रताप सरनाईक यांचे आश्वासन, एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक कामगारांचा भत्ता, घरभाडे, अन्य थकीत भत्ते, दिवाळी अग्रिम निर्णय घेणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कामगारांच्या विविध मागण्या आहेत. त्या रास्त असून या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कामगार संघटना सोबत मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले. बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या भाडेवाढ रद्दच्या निर्णयाची प्रताप सरनाईक यांच्याकडून अंमलबजावणी एसटीची १० टक्के भाडेवाड रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलात

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे …

Read More »