बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावामध्ये बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तत्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून मंत्रिमंडळात …
Read More »राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण, … ती व्यक्तीगत गोष्ट पण, कर्तव्य श्रेष्ठ एक 'नाथांच्या' राज्यात शेतकरी अनाथ
रामचंद्राच दर्शन घ्यायचं असेल तर खुशाल घ्या ती तुमची व्यक्तीगत बाब पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला जाऊन मुंबईत परतले आहेत. मात्र त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून टीका होते आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाला आहे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला मदत करायची सोडून …
Read More »अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीसाठी राज्य सरकारने या निकषात केली दुरूस्ती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
“सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ‘अतिवृष्टी’ ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित …
Read More »अजित पवार यांचा टोला, सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपी पैशाने मस्तपैकी… केंद्रात, राज्यात सत्ता आहे मग सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी कुठल्या वेळेची वाट बघताय? मुहुर्त बघताय का?...
अहो जाहिरातीवर आता ५५ कोटी नाही तर पार १०० कोटी रुपये खर्च जाणार आहे कारण सध्या त्यांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत… लोकांसमोर कसे जायचे… जसे एखादे प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखे – सारखे लोकांना जाहिरातबाजी करुन हॅमरींग करावे लागते आहे. अशापध्दतीने लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने …
Read More »अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधा कृषी मंत्री अब्दुल सत्तार पोहोचले धुळे जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांचे पाहणीसाठी पोहचले
मागील आठवडाभरात जवळपास दोनवेळा अवकाळी पावसाने झोडपल्याने हाता तोंडाशी आलेली पिके हातची निघुन गेली. आधीच शेतमालाला भाव मिळत नसताना आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला या अवकाळी पावसाने चांगलाच तडाका दिल्याने शेतकरी अधिकच संकटात अडकल्याचे चित्र दिसू लागले. याप्रश्नी सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात सातत्याने आवाज उठविला. मात्र राज्य सरकारकडून कोणतीही मदत …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत अंतिम करणार शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून येत्या दोन दिवसांत हे पंचनामे पूर्ण केले जातील आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधान …
Read More »अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या चिखलातः जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना बसला फटका निसर्ग कोपलाः गारपीठाचा मारा, शेतकरी झाला हवालदिल
शेतकऱ्यांच्या आयुष्यात समाधान आणि आनंदाचा उष:काल होईल असं वाटत असतानाच आज पुन्हा त्याच काळरात्रीच्या दिशेला शेतकरी लोटला गेलाय. हा उष:काल उजाडण्याआधीच शेतकऱ्यांच्या नशिबात नको असलेल्या संकटाची काळ रात्र आलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. इतकी मेहनत केली, संघर्ष केला, यातना सोसल्या, वेळप्रसंगी अपमान सोसले, पण तरीही शेतकऱ्यांना पुन्हा पदरी यातनाच पडल्या …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत ग्वाही, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. यासंदर्भात नांदेड, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना निर्देश दिले आहेत. नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते अजित …
Read More »विरोधकांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, मगरीचे अश्रू… अवकाळीचा आठ जिल्ह्यांना फटका; १३ हजार हेक्टरवर नुकसान
राज्यात अवकाळी पावसामुळे ८ जिल्ह्यांत सुमारे १३ हजार ७२९ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदतीसाठी प्रस्ताव तातडीने मागविण्यात आले असून त्यांना तात्काळ मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी विधानसभेत दिली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला बुधवारपासून सुरुवात झाली. विधानसभेचे कामकाज सुरू होताच राज्यात …
Read More »छगन भुजबळ, अजित पवारांचा हल्लाबोल, सरकार रंगाची होळी खेळत असताना… शेतकऱ्यांची 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती; शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करा
अवकाळीने ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृह सुरू होताच केली. गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या …
Read More »
Marathi e-Batmya