Tag Archives: varsha gaikwad

वर्षा गायकवाड यांची टीका, साईभक्तांना भिखारी म्हणणाऱ्या सुजय विखेला सत्तेचा माज साईभक्तांना मोफत प्रसाद लाखो भक्तांच्या दानाच्या पैशातून; सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही

शिर्डीत देशभरातील लाखो भाविक साईबाबाचा प्रसाद म्हणून अन्नछत्रमध्ये जेवतात, या साईभक्तांना भिखारी म्हणाणारा भाजपाचा माजी खासदार सुजय विखे याला सत्तेचा माज आहे. सरंजामी मस्तीतून त्याने साईभक्तांचा अपमान केला. अन्नछत्रातील जेवणाचा खर्च साईभक्तांनी केलेल्या दानातील पैशातून केला जातो, सुजय विखेच्या घरच्या पैशातून नाही, असे खडेबोल सुनावून साईभक्तांचा अपमान करणाऱ्या सुजय विखेने …

Read More »

डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनाने भारताच्या आर्थिक महासत्तेचा पाया रचणारे नेतृत्व हरपले खा. वर्षा गायकवाड यांचे प्रतिपादन

प्रख्यात अर्थतज्ञ, भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. डॉ मनमोहन सिंह यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच भारताने आर्थिक क्षेत्रात जगात मोठा टप्पा गाठला आहे. अत्यंत साधे व्यक्तिमत्व, मितभाषी असणाऱ्या डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनाने भारताच्या आर्थिक महासत्तेचा पाया रचणारे दूरदृष्टीचे नेतृत्व हरले आहे, अशा शब्दात मुंबई काँग्रेसच्या …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, भाजपाच्या गुंडांचा भ्याड हल्ला, सरकारने हल्लेखोरांना अटक करावी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानावर भाजपाची भूमिका म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’.

भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला, त्यावर माफी मागण्याऐवजी भाजपा गुंडगिरी करत आहे. संसदेत भाजपाच्या खासदारांनी दादागिरी केली, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी यांना संसदेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपाच्या …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा खोचक टोला, भाजपाच्या राज्यात देवही ‘सेफ’ नाहीत… फक्त नरेंद्र मोदींचा लाडका मित्रच ‘सेफ’

भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत मंदिरांवरही बुलडोझर चालवला जात असून भाजपाचा हा विध्वंसक बुलडोझर आता श्रीरामाचे परमभक्त हनुमानाचे मंदिर पाडण्यासाठी निघाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या राज्यात देवही ‘सेफ’ नाहीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडका मित्रच ‘सेफ’ आहे, असा घणाघाती हल्ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. यासंदर्भात संताप …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसचा जाहिरनामा ‘मुंबईनामा’, कोणती आश्वासने दिली अदानीचा धारावी प्रकल्प रद्द करणार, बीएमसी शाळांचे मजबुतीकरण, गृहनिर्माण सोसायट्यांना ६ महिन्यात ओसी देणार

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई विभागीय काँग्रेसने मुंबईनामा नावाने जाहिरनामा प्रसिद्ध केला असून या जाहिरनाम्यात मविआ सत्तेत आल्यानंतर धारावीकरांच्या मुळावर उठलेला अदानीचा धारावी प्रकल्प रद्द करून नवीन धारावी पुनर्वसन प्रकल्प रहिवाश्यांच्या इच्छेचा आदर करुन राबविला जाईल. या प्रकल्पात ५०० चौरस फुटांचा भुखंड आणि आर्थिक वापरासाठी जागा देण्यात येईल. यातून कोणालाही वगळले जाणार …

Read More »

अशोक गेहलोत यांचा सवाल, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’ सारख्या घोषणांवर कारवाई का नाही? मविआचे सरकार चोरणाऱ्या भाजपाला विधानसभा निवडणुकीत धडा शिकवा

भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांची सरकारे घोडेबाजार करून पाडली हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रात भाजपाने घोडेबाजार करून सरकार स्थापन केली. राजस्थान मध्येही भाजपाने प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाने चोरले, त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली असून …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानीसाठी एअर इंडिया कॉलनी खाली करण्यासाठी नोटीस घरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असतानाही घरांना सील ठोकण्याचा भाजपा सरकारचा अमानवी प्रकार,

अदानीसाठी काहीही करण्यास तत्पर असणाऱ्या भाजपा युती सरकारने आता सर्व मर्यादा पार केल्या आहेत. एअर इंडिया कॉलनीत अनेक दशकांपासून रहात असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना घरे रिकामी करण्यासाठी अत्यंत अमानुष वागणूक दिली जात आहे. शासन व प्रशासनाने अदानींच्या लोकांना घरे खाली करण्यासाठी काहीही करु देण्याची सुट दिलेली असून फक्त ४८ तासात घर …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा विश्वास, मविआमध्ये कोणतेही वाद नाहीत मैत्रिपूर्ण लढत नाही महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपायुतीचा दावा फसवा व खोटा; प्रगती महाराष्ट्राची नाही तर युतीतील धोकेबाजांची-नाना पटोले

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिलेला नाही. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा करुन मागे घेतले जातील. समाजवादी पक्षाशी सुद्धा चर्चा सुरु असून त्यावरही लवकरच निर्णय होईल. महाविकास आघाडीत कोणतीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजपा युतीत मात्र जागावाटपावरून प्रचंड …

Read More »

शिंदे गटाचे माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश मुंबई काँग्रेस अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांनी आज मुंबई काँग्रेस अधयक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना खा. वर्षा …

Read More »

आशिष शेलार यांचा आरोप, धारावीकरांचा उपयोग करुन मुंबईत व्होट जिहाद वर्षा गायकवाड यांना पुढे करून अडचणीत आणू नका

शहरी नक्षलवादांच्या मार्गदर्शनानुसार उबाठा सेनेची लढाई ही अदानी साठी आहे. आमची लढाई धारावीतील गरिबांच्या घरासाठी आहे. धारावी पुनर्विकासाचा उपयोग करून तिथल्या रहिवाशांची माथी भडकवून, धारावीकरांचा उपयोग करून मुंबई व्होटजिहाद केला जातोय, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. धारावीबाबत आज पुन्हा …

Read More »