राज्यात उखाडा वाढणार : बहुतांष जिल्ह्यात ४० पार तापमान काळजी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात एकाबाजूला कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता तापमानाचा कहरही सुरु झाला आहे. बहुतांष जिल्ह्यात दिवसभरात ४० पार वातावरण गेले असून काही दिवस असाच उखाडा राहणार असल्याचे हवामान खात्याचे के.एस.होसळीकर यांनी सांगितले.
बारामती ४०, ठाणे ४०, उस्मानाबाद ४२, औरंगाबाद ४१, सांगली ४१, जेऊर ४२, मालेगांव ४४, अकोला ४४, अमरावती ४२, गडचिरोली ४०, नागपूर ४२, वाशिम ४२, सोलापूर ४३, जळगांव ४३, पुणे ४०, नांदेड ४३, बुलढाणा ४१, ब्रम्हपुरी ४२, चंद्रपूर ४४, गोंदिया ४०, वर्धा ४२, यवतमाळ ४३ वर तापमान पोहोचले. त्यामुळे या भागात उखाड्याने नागरिक हैराण झाले.
मुंबईतील कुलाबा भागात वातावरण ३४ वर सांताक्रुज येथे ३४ वर तापमान पोहोचल्याने मुंबई आणि उपनगरातील नागरिक उखाड्याने हैराण झाले.

About Editor

Check Also

मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज २०२६: आठ हवामान स्नेही नवोपक्रम विजेते घोषित राज्यपाल आचार्य देवव्रत व पंकजा मुंडे यांच्या हस्ते वितरण

हवामान बदलावरील उपायांना चालना देण्यासाठी मुंबई क्लायमेट वीकच्या समारोपाच्या दिवशी एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ च्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *