राज्यात उखाडा वाढणार : बहुतांष जिल्ह्यात ४० पार तापमान काळजी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात एकाबाजूला कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता तापमानाचा कहरही सुरु झाला आहे. बहुतांष जिल्ह्यात दिवसभरात ४० पार वातावरण गेले असून काही दिवस असाच उखाडा राहणार असल्याचे हवामान खात्याचे के.एस.होसळीकर यांनी सांगितले.
बारामती ४०, ठाणे ४०, उस्मानाबाद ४२, औरंगाबाद ४१, सांगली ४१, जेऊर ४२, मालेगांव ४४, अकोला ४४, अमरावती ४२, गडचिरोली ४०, नागपूर ४२, वाशिम ४२, सोलापूर ४३, जळगांव ४३, पुणे ४०, नांदेड ४३, बुलढाणा ४१, ब्रम्हपुरी ४२, चंद्रपूर ४४, गोंदिया ४०, वर्धा ४२, यवतमाळ ४३ वर तापमान पोहोचले. त्यामुळे या भागात उखाड्याने नागरिक हैराण झाले.
मुंबईतील कुलाबा भागात वातावरण ३४ वर सांताक्रुज येथे ३४ वर तापमान पोहोचल्याने मुंबई आणि उपनगरातील नागरिक उखाड्याने हैराण झाले.

About Editor

Check Also

देशातील मान्सूनच्या स्थितीची छायाचित्रे इस्रोकडून प्रकाशित, अनेक राज्यात मान्सूनची हजेरी डिप डिप्रेशनचा वातावरणीय पट्टा अरबी आणि बंगालच्या उपसागरात

मान्सूनमुळे आज भारताचा मोठा भाग पावसात न्हाऊन निघाला आहे. एकाच वेळी अनेक वादळे एकत्र येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *