पुढील ४ ते ५ दिवस मुंबईसह या जिल्ह्यांना दिला हवामान खात्याने इशारा २५ तारखेला मुंबई आणि महानगरात रेड अलर्ट

राज्यात मागील काही दिवसापासून उघडीप दिली होती. मात्र आता कालपासून पावसाने पुन्हा एकदा आपला हजेरी दाखविण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटेपासूनच मुंबईसह राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच त्यामुळे मुंबई, पालघरसह कोकण आणि राज्याच्या काही भागात आज पासून पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार आणि अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

काल आणि आज असे दोन दिवस पालघर, रत्नागिरी, रायगड, नंदूरबार, पुणे, सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसाठी आज आणि उद्या आणि औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर, येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, सिंधूदुर्ग, जळगांव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सलग दोन दिवस किंवा तीन दिवस यलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. त्यामुळे या भागांमध्ये सतत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस सातत्याने स्थानिक नागरिकांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे.

या सततच्या पावसामुळे अनेक पाणलोट क्षेत्र तथा धरणं भरून जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या कालावधीत काही भागातील धरणांचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना यापूर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचा जोर आणि हवामानाची तीव्रता २८ ऑगस्टपासून कमी होण्याची शक्यता ही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

About Editor

Check Also

सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळणाऱ्या पावसाच्या अनुमानानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *