मान्सूनचे आगमन, अतिमुसळधार पाऊस या भागात पडणार दक्षिण कोकण, रत्नागिरी, सोलापूर, मराठवाडा भागात लवकरच

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून अरबी समुद्रात मान्सून दाखविणारा कमी दाबाचा पट्टा दिसून येत आहे. त्यामुळे पुढील ४-५ दिवसात मुंबई, पुणेसह मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
मान्सून हा दक्षिण कोकण, रत्नागिरीमधून तो मध्य महाराष्ट्रातील ,सोलापूर आणि मराठवाडा येथे लवकरच पोहोचणार असून पुढील ४८ तासात तो राज्यातील बहुतांषी भागात पोहोचेल असा अंदाज असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्र वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून मुंबई क्लायमेट वीक हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *