Breaking News

राहुल गांधी यांचा खळबळजनक आरोप, मोदी, शाह यांनी ३० लाख कोटींचा आर्थिक घोटाळा गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांना सहभाग- जेपीसी कमिटीमार्फत चौकशी करा

लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होवून काही तासांचाच अवधी लोटला आहे. तोच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूक निकाला आधी गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअकर मार्केट मधील माहिती जाहिर करत ३० लाख कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा खळबळजनक घोटाळा केला असून त्याची जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तसेच या एक्झिट पोल ज्याने जाहिर केले आणि ज्याने ते बनविले त्याचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहिर होण्याआधी अदानी यांच्या मालकीच्या वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी पुढे आल्याचेही सांगितले. काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी बोलत होते.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणूकीच्या एक दिवस आधी अर्थात ३ जूनला देशातला शेअर मार्केट मोठ्या प्रमाणावर कोसळला. त्यानंतर ४ जून रोजी मोठ्या प्रमाणावर तो सावरलाही. त्यातच अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्र्यांनी अदानीच्या मालकीच्या एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्पष्टपणे सांगितले की, शेअर मार्केट मध्ये जी काही खरेदी करायची आहे ती त्यांनी ४ जून पूर्वी करावी जेणे करून त्यांचा पैसा वाचेल आणि ४ जूनला शेअर बाजार मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा सल्ला या तिन्ही नेत्यांनी गुंतवणूकदारांना दिला. या सल्ल्यामुळे अमेरिकास्थित गुंतवणूकदार आणि भाजपाच्या संपर्कातील गुंतवणूकदारांनी ४ जूनला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा झाला असून हा फायदा ३० लाख कोटी रूपयांचा असल्याचा दावाही केला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, या गोष्टीची साखळी बघितली तर एक्झिट पोल मध्ये सुरुवातीला जाहिर करण्यात आलेले आकडे. या आकड्यांचा खेळ हाही त्या साखळीचा भाग आहे. त्यामुळे एक्झिट पोलचे आकडे कोणी तयार केले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी केली. या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी जेसीपीच्या माध्यमातून करण्याची मागणी करत असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, स्टॉक मार्केटमधील शेअर्सची किंमत कधी वाढणार आहे, तो वाढणार आहे याची माहिती अमित शाह, पंतप्रधान मोदी यांना कशी माहिती, तसेच निवडणूक निकालाच्या तोंडावरच ती कशी जाहिर करण्यात आली. यावरून या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे बाहेर आले पाहिजेत असेही यावेळी सांगितले.

यावेळी काही प्रसारमाध्यमांनी राहुल गांधी यांना सवाल केला की, या घोटाळ्यातून कोणाला फायदा झाला असे वाटते अदानीला झाला का, त्यावर राहुल गांधी म्हणाले की, अदानीला निश्चित झालेला असेल, याशिवाय भाजपाकडे सध्या परदेशातील अनेकजण आहेत. त्यांच्या मार्फत हा घोटाळा केला जाण्याची शक्यता अधिक आहे. त्याशिवाय शेअर मार्केटमध्ये एकाच दिवशी शेअर्सच्या किंमतीत घट होणे आणि लगेच दुसऱ्या दिवशीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणे यावरून हा सर्व प्रकार एका कटाचा भाग असल्याचे दिसून येत असल्याचे दिसून येते.

https://x.com/RahulGandhi/status/1798686066888868291

Check Also

नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य,… लढाई अजून संपलेली नाही काँग्रेसच्या ५ न्याय व २५ गॅरंटी घरोघरी पोहचवण्यात सेल व विभागाचे मोठे योगदान

काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *