अजित पवार यांचे जयंत पाटील यांना प्रत्युत्तर, “…येवढं लक्षात ठेवा…” कविता आणि शेरोशायरीतून प्रत्युत्तर देत सोबत येण्याची घातली साद

अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान जयंत पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर कवी विं दा करंदीकर यांच्या कवितेचा संदर्भ देत आणि शेरोशायरीतून यथेच्छ टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर देताना अजित पवार यांनीही शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनाही विं दा करंदीकर यांच्या कवितेतून प्रत्युत्तर देत शेरोशायरीतून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे काही काळ विधानसभेतील सदस्य काहीकाळ हस्सकल्लोळात बुडाले.

अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, आमच्या जयंत पाटील यांना आजकाल कविता आणि शेरोशायरी करण्याची भलतीच आवड निर्माण झालेली दिसतेय. त्यामुळे मलाही आता विं दा करंदीकरांच्या एका कवितेची आठवण होत असून ती जंयत पाटील यांच्यासाठी असल्याचे सांगत कवितेचे नाव “…येवढं लक्षात ठेवा…” असे आहे. विं दा करंदीकर आपल्या कवितेत म्हणाले की, उंची न वाढते फारसी, तर ज्याने तयाने केली मदत येवढंच लक्षात ठेवा, ही पूर्वजांची थोरवी त्यांना गोड वाटे, ह्यांना का गोड का वाटे येवढे लक्षात ठेवा, विश्वास ठेवावाच लागेल चिंता उद्योगी घालवे येवढं लक्षात ठेवा ही कविता वाचून थेट जयंत पाटील यांना सोबत येण्याची आणि एकाच पक्षात असताना केलेल्या मदतीची आठवण करून अजित पवार यांना करून दिली.

त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना एका शेरोशायरीचा आधार घेत साथ दिल्याची आठवण करून दिली. तर शेवटी जयंत पाटील यांच्यावर निशाणा आणि सोबत येण्याची साद घालत सोबत आल्यास जिथे भेट द्यायची असेल त्या ठिकाणी भेटीसाठी घेऊन जातो, सोबत नेतो, अडचण असेल त्या ठिकाणी अडचण सोडविण्यासाठी मदत करतो अशा आशयाची काव्यात्मक सोबत येण्याची गळही यावेळी अजित पवार यांनी जयत पाटील यांना घातली.

About Editor

Check Also

मंत्र्याचे कामकाज हस्तांतरण, भास्कर जाधव आक्रमक, राहुल नार्वेकर म्हणाले ही प्रथा २०१९ पासूनची एकनाथ शिंदे यांच्याकडील अतिरिक्त मंत्री पदाचे अधिकार अधिवेशन काळात इतरांकडे

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनास काल पासून सुरुवात झाली. मात्र आज अधिवेशनाचे कामकाज आज सुरु झाल्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *