Breaking News

विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल, पालकमंत्री फडणवीसांच्या गडचिरोली जिल्ह्यात…. लोकांच्या जिवंतपणीच्या मरण यातना प्रत्यक्ष जाऊन बघाव्यात

गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली आहे. या जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील दाम्पत्य दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट काढत जात असल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ शेअर करीत शासनाच्या आरोग्य व्यवस्थेती चिरफाड करीत या घटनेमुळे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढले.

विजय वडेट्टीवार व्हिडीओ शेअर करत म्हटले की, आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासात दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे आई-वडीलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावर अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायी गाठले. हे चित्र पाहताच अंगावर काटा उभा राहतो अशा प्रकारे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात आज पुन्हा पुढे आले. या अनेस्थेमुळे सरकारच्या कारभारावरावरही प्रश्नचिन्ह उभे केले.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा आहे. हेलिकॉप्टर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे मोठ्या तोऱ्यात सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जीवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरण यातना काय असतात एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे अशी खोचक टीकाही यावेळी केली.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *