Breaking News

जाहिरसभेत अजित पवार यांची आवाहन, मी जी चूक केली…ती करू नका धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्येवरून केले आवाहन

राज्यातील पक्षफुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून त्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूका आता येऊ घातल्या असून या निचवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडूण येण्याच्या हमीवर अजित पवार गटातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्ये हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करत आहेत. त्याचबरोबर शरद पवार यांनी एकाबाजूला त्यांचे पुतणे तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकिय कोंडी करण्याबरोबरच भाजपाचीही नाकेबंदी करण्याचे काम सुरु केले.

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी कोल्हापूरातील भाजपामध्ये असलेले समरजीत अजितघाटगे यांना भाजपाचा त्याग करायला लावत राष्ट्रवादीत आणले. त्याचबरोबर कोल्हापूरातील इतर आमदारांची भेट घेत योग्य तो संदेश दिला. तसेच पुणे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील सोडून गेलेल्या अनेक आमदारांना पुन्हा एकदा सशक्त पर्याय देण्याचे प्रयत्न सुरु केले.

या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदारांना पुन्हा निवडून येण्याची शाश्वती नाही. तसेच परतीचे दोरही कापलेले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या कन्या, सुपुत्र यांना शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी देण्याची प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत बाप विरूद्ध पोरगी किंवा मुलगा असे चित्र पाह्यला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्येने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षात प्रवेश कऱण्याचा निर्णय़ घेतल्याची चर्चा सुरु झाली. त्यातच लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमानिमित्त धर्मराव बाबा आत्राम यांच्या मतदारसंघात जाहिर आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलताना मंत्री धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, जी मुलगी बापाची झाली नाही, ती शरद पवार यांची कशी होईल असा सवाल उपस्थित करत मुलीने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचेही यावेळी सांगितले.

यावर कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, माझे सर्वांना सांगणे आहे की, कृपया घरात फूट पडू देऊ नका असे आवाहन करत पुढे म्हणाले की, घरात फूट पाडून मी जी चूक केली आहे. ती चूक कोणी करू नका अशा स्पष्ट शब्दात सांगत धर्मराव बाबा आत्राम यांना आणि त्यांच्या मुलीला आवाहन केले.

Check Also

महाराष्ट्रातील वीज खरेदीचे कंत्राट अदानीला; जयराम रमेश यांचे पाच प्रश्न जयराम रमेश यांचा आरोप, पराभवाच्या छायेखाली असतानाही कंत्राट अदानीलाच

राज्याच्या ऊर्जा विभागाने नुकतेच वीच खरेदी संदर्भात निविदा काढली होती. मात्र हि निविदा अदानीलाच मिळावी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *