सुप्रिया सुळे यांचा सवाल, अमित शाह बरोबर डर्टी डजन मधील एकाला पाहिले देश बंदुकीवर नाही संविधानावर चालतो हे सरकार मराठी माणसांच्या विरोधातलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा बोलवून नागरिकांना त्रास होईल, असे प्रशासनाने काही करु नये कारण यापूर्वी त्याच प्रकल्पाचे पाच वेळा उद्धघाटन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या कामात व्यस्त असताना राज्य सरकारने सहाव्यांदा त्याच कामासाठी त्यांना पुण्यात का बोलवले, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे भाजपा प्रणित राज्य सरकारवर केला.

राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ज्या मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पुण्यात येणार होते, त्याचं उद्घाटन आतापर्यंत पाच वेळा झालं आहे. हा प्रकल्प एकच आहे. मात्र पुन्हा-पुन्हा उद्घाटन केलं जात आहे. पहिल्यांदा पंतप्रधान ग्राऊंड ब्रेकिंगसाठी आले नंतर पहिल्या ट्रायलसाठी आले. ह्या सगळ्यांची यादी पुण्यातील पत्रकारांकडे आहे. मोदींचा दौरा रद्द झाला नसता तर आज सहाव्यांदा त्याच कामाचं उद्घाटन झालं असतं, असा खोचक टोलाही यावेळी लगावला.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पंतप्रधान हे खूप कामात असतात. मात्र महाराष्ट्र सरकार देशातील इतक्या महत्त्वाच्या माणसाचा वेळ एकाच कामासाठी का घेतय? दिल्लीला नाव मी ठेवणार नाही, पण राज्य सरकारचं आश्चर्य वाटतं. ते एकाच कामासाठी सहाव्यांदा पंतप्रधानांना का बोलवतात. हे उद्घाटन ऑनलाइनही होऊ शकतं, असा टोलाही राज्य सरकारला लगावला.

पुणे पालिका प्रशासनावर सुप्रिया सुळे टीका करताना म्हणाल्या की, कालच्या पावसामुळे पुण्यात निर्माण झालेल्या परिस्थितीला योग्य नियोजन न करता होत असलेली विकासकामं जबाबदार असल्याचा ठपका ठेवत ही कामे करताना ड्रेनेजची पर्यायी व्यवस्था होताना दिसत नाही. त्यातून पाणी साचते. कितीही पाऊस झाला तरी पंतप्रधानांचा कार्यक्रम होईल असं कालपर्यंत सत्ताधारी म्हणत होते. प्रशासनही तसं सांगत होतं. प्रशासन नेमकं काय जादू करणार होतं माहीत नाही. त्यामुळे मीही पुण्याला निघाले होते. पण दुर्दैवानं कार्यक्रम रद्द झाला, असा कुत्सित खोचक टोला ही लगावला.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, शहरीकरण करताना ज्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ती घेतलेली नाही असं तज्ञांचे मत आहे. म्हणूनच सातत्याने पूरपरिस्थिती निर्माण होतेय हे दुर्दैवी असल्याचं मतही यावेळी व्यक्त केले.
संजय राऊत यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, किरीट सोमय्या अनेक वर्षांपासून एक मोठे फायटर आहेत. डर्टी डझन नावाची सीरिज त्यांनीच काढली. मी कधीच विसरले नाही. डर्टी डझन कुठे आहेत, हा एक मोठा प्रश्नच आहे. काल मी त्या डर्टी डझनपैकी एका माणसाचा फोटो अमित शाहसोबत बघितला. ज्यांना एका वर्षापूर्वी हे डर्टी डझन म्हणत होते, तेच डर्टी डझन अतिशय विनम्रपणे अमित शाहांना भेटले. मला कौतुक दोघांचंही वाटतं. कारण त्यांचा पक्ष त्यांना डर्टी डझनपैकी एक म्हणत होता. मला गंमत त्या माणसाचीही वाटते, ज्याच्या बायकोला लढावं लागलं. त्यांच्या नातवडांना दूध मिळत नव्हतं. त्यांची बायको लढत होती. ज्यांनी ईडी तुमच्या घरी पाठवली. ते त्यांना अभिवादन करत होते असेही यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, दोघांची विश्वासार्हता इथे पणाला लागली आहे. अमित शाहना माझा प्रश्न आहे की, ज्या माणसाच्या घरी तुम्ही ईडी पाठवली. ज्या माणसावर तुम्ही ईडी आणि सीबीआयच्या केसेस केल्या. त्या माणसाला डर्टी डझन तुमचा पक्ष म्हणत होता. मग तुम्ही त्याला हॅण्डशेक केलाच कसा? असा सवाल करत ती फाईल क्लिअर आहे का, मग भाजपाने आणि अमित शाहनी टीव्हीवर येऊन सांगायल हवं की, त्यांनी जो हसन मुश्रीफांवर आरोप केला; तो खोटा होता. एवढं तरी त्यांनी खरं बोलावं. हसन मुश्रीफांनीही त्यांना शेकहॅण्ड करताना आम्हाला सांगावं की, हे अमित शाह आहेत. त्यांनी माझी माफी मागितली आहे. माझ्या घरावर हल्ला केला, माझ्या नातवंडांना दूध दिलं नाही. माझ्या बायकोच्या अश्रुंची किंमत अमित शाहनी आमच्या घरात येऊन फेडली म्हणून मी त्यांना हॅण्डशेक करतोय, असा उपरोधिक टोलाही यावेळी लगावला.

अक्षय़ शिंदे याच्या एनकांऊटरवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही काही वेब सिरीज नाही, हा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीवर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. देवेंद्र फडणवीस जितक्या वेळी बंदूक आमच्यावर रोखतील तितक्या वेळा आम्ही त्यांना संविधान दाखवू. यासाठी त्यांच्या गोळ्या खायची वेळ आली तरी चालेल. फडणवीसांचे वागणे हे छत्रपती शिवराय आणि शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राला अशोभनीय असल्याची टीकाही यावेळी केली.

About Editor

Check Also

जयंत पाटील म्हणाले, सांगलीच्या मातीने कधीही अविचारांना थरा दिला नाही मतदारांनी जिल्ह्याची ओळख अबाधित ठेवली

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तब्बल १८ ठिकाणी विजय मिळवला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *