प्रकाश आंबेडकर फडणवीसांना म्हणाले, राजदंड उचलतो, त्याला राज्य चालविता आलं पाहिजे संभाजी भिडे आणि लक्ष्मण हाके यांनी केलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्यावरून माजी खासदार संभाजी राजे या भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेला संभाजी भिडे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना अटलबिहारी यांच्या वक्तव्याची आठवण करून देत म्हणाले की, ज्याला राजदंड उचलता येतो त्याला राज्य चालविता आलं पाहिजे. जो कायद्याला मानत नाही त्याला आतमध्ये टाकण्याची संधी असली पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांनी भिमा कोरेगांवच्या वेळी आत टाकलं नाही, संभाजी भिडे याला पाठीशी घातलं आणि एकदृष्टिने बळ दिलं. ती चूक पुन्हा करू नका ही माझी अपेक्षा असल्याचे सांगितले.

भाजपाकडून रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर देशातील ३२ लाख मुस्लिम समुदायातील नागरिकांना सौगात-ए-मोदी किटचे वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये खाण्या-पिण्याचे पदार्थ आणि कपडे असणार आहेत. यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इतर पक्ष वाटप करतात आणि भाजपा व आरएसएस करते तेव्हा वेगळा संदर्भ येतो. १९९९ सालापासून सत्तेत आल्यापासून अँटी मुस्लिम भूमिकेचा स्टँड राहिला आहे. गोध्रा घडविण्यात आलेलं आहे. रेल्वेचे जुने डबे घेतले, जळाले नाही, आणि आतून जळालेत, २०१४ साली सत्तेत आल्यानंतर अखलाक, शाबीर यांचे मॉब लिंचिग केलं जातं आणि त्याचे व्हिडिओ आपल्याला मिळतात. मुस्लिमाना साईड ट्रॅक करायचं हा भाजपा आणि आरएसएसचा प्रयत्न आहे. त्यामुळे सौगात-ए-मोदी कार्यक्रम येतो तेव्हा शंका येते हा राजकिय दृष्ट्या केलेला कार्यक्रम असल्याची टीकाही यावेळी केली.

दरम्यान, संभाजी राजे यांच्या भूमिकेला विरोध करताना संभाजी भिडे म्हणाले की, वाघ्या कुत्र्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतलीही कथा सत्य आहे. त्यामुळेचं त्याचं स्मारक उभारण्यात आलं. माणंस जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात. देशाशी एकनिष्ठ राहायचं आहे हे त्याचं द्योतक म्हणून ते स्मारक हवंच. वाघ्याच्या नावावर जे चाललं आहे आणि संभाजी राजे जे बोलत आहेत ते १०० टक्के चूक असल्याचेही सांगितले होते.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट विभागांचा गौरव कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर विभागांनी काम करावे

राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *