गांधीजींची सत्य व अहिंसा ही तत्वे मोदी पाळतात का? राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी
महात्मा गांधीजींच्या सत्य व अहिंसा या दोन तत्त्वाने मोदी वागत नाही तोपर्यंत तुम्हाला महात्मा गांधीजींच्या नावाने राजकारण करण्याचा अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दांडी यात्रेच्या स्मरण दिनानिमित्त महात्मा गांधीजींवर ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगला उत्तर देताना नवाब मलिक यांनी महात्मा गांधीजींची सत्य आणि अहिंसा ही दोन तत्वे मोदी पाळतात का ? असा सवालही केला.
महात्मा गांधी यांच्यावर ब्लॉग लिहिताना मोदी यांनी कॉंग्रेसवर टिका केली आहे. आमचा एकच प्रश्न मोदींना आहे की, महात्मा गांधीजींच्या नावाने राजकारण करता परंतु त्यांच्या विचाराचे पालन किती करता आहात असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी केला.

About Editor

Check Also

राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांचे आदेश, एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा सर्वंकष आराखडा तयार करावा वर्धा संदर्भात आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आल्यानंतर दिले निर्देश

राज्य राखीव पोलीस बलाचे (एसआरपीएफ) अत्याधुनिक व जागतिक दर्जाचे प्रशिक्षण केंद्र वर्धा येथे उभारण्यासाठी सर्वंकष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *