राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर, या अपघातामागे घातापात असल्याचे कर्जत जामखेडचे आमदार तथा अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत रोहित पवार यांनी जवळपास तीन दिन झाले, रोहित पवार हे यांनी सुरुवातीला मंत्रायाच्या जवळील मरिन लाईन्स पोलिस स्टेशन आणि बारामती पोलिस स्टेशनममध्ये विमान कंपनी व्हिएसआर च्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांकडून या दोन्ही ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी या दोन्ही तीन्ही ठिकाणी गुन्हा नोदविण्यास पोलिसांनी नकार दिला.
त्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेवटी या अनुषंगाने अरोप केला.
मा. राज ठाकरे साहेब हे राज्यातील एक लोकप्रिय नेते असून त्यांना मानणारा राज्यात एक मोठा वर्ग आहे. आज त्यांची भेट घेऊन अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी त्यांना पुराव्यांसह सविस्तर माहिती दिली आणि त्यांच्याही मनात असलेल्या काही प्रश्नांविषयी चर्चा केली. यावेळी माझे मित्र… pic.twitter.com/9aOaLHGD1y
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 27, 2026
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघाताविषयीची मी गोळा केलेली माहिती द्यायची असल्याने राज ठाकरे यांनी मला तात्काळ वेळ दिली. राज ठाकरे यांनी बराच वेळ माझ्याकडून घटना समजून घेतल्या. माझ्याकडील माहिती समजून घेतली. पोलिसांनी या घटनेत एफआयआर का घेतला नाही असा प्रश्न त्यांनीही यावेळी उपस्थित केला. त्यांचा कायद्याचा अभ्यास चांगला आहे, त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील दोन दाखले दिले. अपघाती मृत्यू झाल्यानंतर एफआयआर घ्यावाच लागतो. हा नागरिकांचा अधिकार आहे. तसेच एफआयआर घेणे पोलिसांवर बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील एका मोठ्या नेत्याचा मृत्यू झाल्यानंतरही एफआयआरच होत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट असल्याचे सांगितले. याबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार हे येत्या काळात कळेलच. पण राज ठाकरेंनीही अजित पवार यांच्याविषयीच्या आठवणी यावेळी जागवल्याचे सांगितले.
शेवटी बोलताना रोहित पवार म्हणाले की, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होती की, एका महिन्याच्या आत आम्ही अपघातासंदर्भातील अहवाल प्रसिद्ध करू अपघाताला आज एक महिना होत आहे. आज आणि उद्या आम्ही अहवाल येतो की नाही याची वाट पाहणार आहोत. जर थातूर मातूर अहवाल दिला तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही असा इशारा देत दोन दिवसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपणही एक अहवाल प्रसिद्ध करणार असल्याचे स्पष्ट केले.
Marathi e-Batmya