मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, पुणे विषारी दारूकांड प्रकरणात कठोर कारवाई पुणे आणि पिंपरी चिंचवड प्रकरणी दिले आदेश

पुणे विषारी दारू कांड ही एक प्रकारे केलेली हत्याच आहे. त्यामुळे या घटनेत अतिशय कठोर कलमे लावण्यात येत असून या  प्रकरणाची सर्व पाळेमुळे खणून काढण्यात येतील. तसेच  ही इकोसिस्टिम नष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

पुणे विषारी दारूकांडात सुमारे १३ जणांना आतापर्यंत आपले प्राण गमवावे लागले आहेत. आणखी काही जण रूग्णालयात गंभीर स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझे पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून  आणखी काही लोक यात सहभागी असण्याची शक्यता आहे. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. जे पिडित  गंभीर रूग्ण आहेत त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात पोलीस विभाग आणि राज्य  उत्पादन शुल्क विभागाकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली आहे. विषारी दारूकांडामागची संपूर्ण साखळी शोधून अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. या घटनेत  संपूर्ण इकोसिस्टिम शोधून ती नष्ट करण्यात येईल, असेही सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्राच्या अर्धा डझन मंत्र्यांच्या हाती वाटाण्याच्या अक्षता कांद्याला १५०० रुपये नाही तर ३००० रुपयेच भाव द्या, बकरी ईदच्या निमित्ताने दंगली भडकवण्याचे भाजपाचे षडयंत्र, भाजपाच्या भूमिकेमुळे पशुपालन करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचे नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भरतेचे गाजर दाखवून अर्थव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानेच इंधन संकट ओढवले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *