महाराष्ट्रातील तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, राज्यातील ३.३७ लाख मेट्रिक टन तूर खरेदीला केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी दिली. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे ‘किंमत समर्थन योजने’अंतर्गत (PSS) सुमारे २,६९६ …
Read More »महिला शेतकऱ्यांसाठी २३ जानेवारी रोजी मुंबईत चर्चासत्राचे आयोजन कृषी विभाग आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम
महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतक-यांच्या विविध विषयाच्या अनुषंगाने २३ जानेवारी २०२६ रोजी चर्चा सत्र होणार आहे.या चर्चा सत्राचे उद्घाटन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, राज्य कृषी मंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे हॉल क्रमांक ४ येथे सकाळी १० वाजता …
Read More »कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना मंत्री दत्तात्रय भरणे यांनी परदेश दौ-यावर जाणा-या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाला दिल्या शुभेच्छा
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या ज्ञानवृद्धी व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने “शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजना”मधील परदेश भेटीसाठी रवाना झालेल्या पहिल्या गटातील शेतक-यांना कृषीमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सहभागी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करून …
Read More »केंद्रीय कृषी आयुक्त सिंग यांची माहिती, ब्रोकोलीसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारणार जे डब्लू मॅरियट जुहू येथे परिषदेचे उद्घाटन
केंद्र सरकार ब्रोकोलीच्या लागवड, प्रसार, पायाभूत सुविधा विकास आणि कोल्ड स्टोरेज सुविधांसाठी समर्पित उत्कृष्टता केंद्र (Center of Excellence) स्थापन करणार आहे. पोषक तत्त्वांनी नैसर्गिक सुपरफुड असलेल्या ब्रोकोलीला लोकप्रिय करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कृषी आयुक्त, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय (MoA&FW), भारत सरकार, डॉ. पी.के. सिंह यांनी मुंबईतील हॉटेल …
Read More »मुंबईत १५-१६ जानेवारी २०२६ रोजी पहिल्यांदाच भव्य ब्रोकोली परिषद सुपरफूड म्हणून ओळखल्या जाणारे ब्रोकोली ते आरोग्य
आरोग्य, पोषण आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, ‘सुपरफूड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रोकोलीसाठी समर्पित पहिल्यांदाच भव्य परिषद मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. “ब्रोकोली लागवडीपासून ते तुमच्या आरोग्यापर्यंत” या थीमवर ही परिषद १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत होईल, त्यानंतर १६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील …
Read More »केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा तीन दिवसांचा महाराष्ट्र दौरा अहिल्यानगर आणि नाशिक येथे विविध कार्यक्रमांना उपस्थिती
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३१ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा शेतकरी, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी नव्या संधी यांना समर्पित असून, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या शेतकरी व …
Read More »तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी ९४ लाखांचा निधी मंजूर राज्यातील रेशीम शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
महाराष्ट्र शासनाच्या रेशीम संचालनालयामार्फत २०२५–२६ या आर्थिक वर्षात हमी भावाने खरेदी करण्यात आलेल्या तुती बीजकोष व रिलिंग कोष (रेशीम धागा निर्मितीकरिता आवश्यक) यासाठी ९४.०७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वस्त्रोद्योग विभागामार्फत शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला. राज्यातील रेशीम शेतकऱ्यांना दर्जेदार व रोगमुक्त अंडीपुंज …
Read More »किटकनाशके साठा व विक्री, घरगुती किटकनाशके विक्री परवाना घेणे बंधनकारक पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स साठीही परवाना आवश्यक
कृषी विभागाकडून मुंबई शहर,मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यांमध्ये किटकनाशके साठा विक्री व घरगुती किटकनाशके विक्री परवाने देण्यात येतात. किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी (पेस्ट कंट्रोल ऑपरेशन्स) कृषी विभागाचा परवाना असणे बंधनकारक आहे. परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे की, अनेक विक्रेते घरगुती किटकनाशके विक्री (मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकाने, सुपर मार्केट, बझार …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन, लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही कृषी योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांना विधान परिषदेत माहिती
राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा निधी व अनुदान प्रलंबित असल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कृषी मंत्री भरणे यांनी ही …
Read More »ओल्या दुष्काळामुळे आणि वन्य प्राण्यांमुळे नष्ट झालेल्या पिकांसाठी विमा संरक्षण देखील उपलब्ध
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर केली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागण्यांपैकी दोन प्रकारचे नुकसान आता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत (Crop Insurance) भरपाई दिली जाईल. चौहान यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मी आज तुम्हाला आनंदाची बातमी देत आहे. …
Read More »
Marathi e-Batmya