भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) ने पात्र स्टॉक ब्रोकर्स (QSBs) यांना इक्विटी कॅश मार्केटमध्ये पर्यायी T+0 रोलिंग सेटलमेंटसाठी आवश्यक असलेल्या प्रणाली आणि प्रक्रिया लागू करण्यासाठी आणखी एक मुदतवाढ दिली आहे. उद्योग अभिप्राय दर्शवितो की अनेक QSBs १ नोव्हेंबर २०२५ ची पूर्वीची अंतिम मुदत पूर्ण करण्यात ऑपरेशनल आणि तांत्रिक आव्हानांना …
Read More »महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार हरित बंदर विकासा बाबत डेन्मार्कच्या कंपनीसोबत चर्चा
नेस्को गोरेगाव येथे सुरू असलेल्या इंडिया मेरीटाईम वीक मध्ये मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत २६० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. महाराष्ट्र सागरी मंडळाचे हे करार इचइंडिया आणि नॉलेज मरीन या कंपन्यांसोबत करण्यात आले. या करारांमध्ये यामुळे हरित टगबोटीसाठी बॅटरी निर्मिती आणि जहाज बांधणी व दुरुस्ती, बंदर …
Read More »स्टुडिओत १७ मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिस गोळीबरात मृत्यू पवई भागात रोहित आर्य नावाच्या एका इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवले
मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी १७ मुलांची सुखरूप सुटका केली. तसेच रोहित आर्यने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी लागल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात येते होते. उपचारा दरम्यान रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती समोर …
Read More »हसन मुश्रीफ यांचे आदेश, रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी रुग्णालयात सुधारणा करा
राज्यातील शासकीय रुग्णालयातील मृत्यूदर कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. सेंट जॉर्ज रुग्णालयात मृत्यूदर वाढीची वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी गांभीर्याने दखल घेऊन याविषयी तातडीच्या बैठकीचे आयोजन केले. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, संचालक डॉ. अजय चंदनवाले, जे.जे. रुग्णालय आणि …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नाही तर हत्याच, उच्चस्तरीय चौकशी करा डॉ. संपदा मुंडे प्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना क्लिन चिट देण्याची मुख्यमंत्र्यांना घाई का, ते कोणाला व का वाचवत आहेत
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी राजकीय दबाव, ब्लॅकमेलिंग व त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. भाजपाचा माजी खासदार, प्रशासन व पोलीस यांच्या त्रासाला कंटाळून तीला आयुष्य संपवावे लागले. पण ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे. या प्रकरणाची सीबीआय, एसआयटी अथवा स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार …
Read More »सभापती राम शिंदे यांचे निर्देश, मुंबईमधील खासगी कोचिंग क्लास तपासणीसाठी समिती गठित करा तपासणी अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश
मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित अधिकाऱ्यांची समिती गठित करावी. या समितीने मुंबईमधील खासगी कोचिंग क्लासची तपासणी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा असे, निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता …
Read More »दादाजी भुसे यांची माहिती, शालेय पोषण आहार कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक शालेय पोषण कामगारांच्या मानधनामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा
शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या मानधनामध्ये वाढ व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात …
Read More »पंकजा मुंडे यांची माहिती, पशुपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जामुळे पशुपालकांची उत्पन्न वाढ राज्यातील पशुपालकांना मिळणार वीजदरात सवलतीचा लाभ
राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात सवलतीचा लाभ देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून यामुळे पशुपालकांना वीज दर सवलतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या मंत्री …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, निवडणूक आयोग मतदार याद्या दुरुस्त का करत नाही? जाब विचारण्यासाठी १ नोव्हेंबरला मोर्चा
मतदार याद्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घोळ आहेत हे काँग्रेस पक्षाने सर्वात आधी पुराव्यासह दाखवून दिले आहे. पण निवडणूक आयोग त्याची गंभीरपणे दखल घेत नाही. झोपलेल्या या निवडणूक आयोगाला जागे करण्यासाठी सर्व पक्षांनी १ नोव्हेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चात काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »प्रताप सरनाईक यांचा इशारा, मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही… मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा
एसटी ही महाराष्ट्राची ‘ लोकवाहिनी ‘ आहे . दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासी सेवेचा लाभ घेतात. त्यांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणे हे एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने एसटीच्या सुरक्षा व दक्षता खात्याला …
Read More »
Marathi e-Batmya