राज्य सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी मराठा आणि मराठा कुणबी असे प्रमाणपत्र देण्यास सुरवात केली असतानाच आता राज्यातील ओबीसी समाजाच्या नेत्यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसींमधून आरक्षण देण्यास ठाम विरोध केला आहे. यासंदर्भात दिवाळीनंतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरणार असून राज्यभर मेळावे घेऊन ओबीसी आंदोलनाला सुरुवात केली जाणार आहे. मराठा …
Read More »नाना पटोले यांची मागणी,… सरकारने भूमिका स्पष्ट करावी
मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करुन राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारमधील दोन मंत्रीच आरक्षणावर वेगवेगळी विधाने जाहीरपणे करत आहेत. सरकारमध्ये एकवाक्यता दिसत नाही त्यामुळे आरक्षणाप्रश्नावर भाजपा व शिंदे सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. टिळक भवन येथे प्रसार …
Read More »भारतात १५ डिसेंबरपासून क्रॅश टेस्ट सुरू या गाड्यांची प्रथम चाचणी होणार
देशात धावणाऱ्या कारला सुरक्षितता रेटिंग देण्यासाठी भारतीय एजन्सी भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत NCAP किंवा BNCAP) १५ डिसेंबर २०२३ पासून क्रॅश चाचण्या सुरू करणार आहे. या याचणीसाठी आतापर्यंत वाहन कंपन्यांनी तीन डझनहून अधिक मॉडेल्सची नोंदणी केली आहे. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि महिंद्रा अँड महिंद्रासारख्या कंपन्या क्रॅश चाचण्यांच्या …
Read More »केंद्र सरकारने लाँच केला भारत आटा आणि डाळी २७.५० रुपयांना मिळणार पीठ
गव्हाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे सणासुदीच्या काळात पिठाच्या किमतीत झालेली वाढ पाहता सरकारने स्वस्त दरात पीठ आणि डाळी विकण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार देशभरात २७.५० रुपये प्रति किलो दराने भारत आटा तर डाळी ६० रूपये दराने उपलब्ध करून देणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सोमवारी, ६ नोव्हेंबर रोजी दिल्लीत …
Read More »छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती,… पण सरसकट आरक्षणाला विरोधच बीड मध्ये ओबीसी बांधवांच्या घरावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट
मी मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र ओबीसी मधल्या लहान घटकावर अन्याय होऊ देणार नाही. राज्यातल्या ओबीसी समाजावर अन्याय करण्याची भूमिका कोणीही घेऊ नये असे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे. राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री …
Read More »सुनिल तटकरे म्हणाले, अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले पूर्व विदर्भातील दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस ;गोंदियातून निर्धार नवपर्वाचा...
आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले मात्र आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेनेच योग्य ठरवले आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. गोंदिया येथे आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचे योगदान किती मोठे …
Read More »महाराष्ट्र विधान परिषदेचा शतक महोत्सवः आजी-माजी सदस्यांचा स्नेह मेळावा
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विधान परिषदेच्या आजी- माजी सदस्यांसाठी स्नेहमेळावा आणि परिसंवादाचे बुधवार ८ नोव्हेंबर २०२३ सकाळी ११.१५ वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही माहिती दिली. संसदीय लोकशाहीत द्विसभागृह व्यवस्थेत महाराष्ट्र विधान परिषदेने उल्लेखनीय योगदान दिले आहे. …
Read More »हिरालाल समरिया देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
देशाचे १२ वे मुख्य माहिती आयुक्त म्हणून हिरालाल समरिया यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी माहिती आयुक्त समरिया यांना राष्ट्रपती भवनात मुख्य माहिती आयुक्त पदाची आज शपथ दिली. समरिया सध्या माहिती आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी कामगार आणि रोजगार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. हिरालाल समरिया यांच्याविषयी …
Read More »भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार पुतळ्याचे अनावरण
काश्मिरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल (मराठा एलआय) याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील …
Read More »नाना पटोले यांचे आव्हान, हिंमत असेल तर स्था.स्व. संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवाच ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस ७२१ तर मविआ १३१२ जागांवर विजयासह राज्यात आघाडीवर
राज्यातील २ हजार ३२० ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे. भाजपने केलेले दावे साफ खोटे …
Read More »
Marathi e-Batmya