Editor

५० हजार शिक्षकांच्या भरतीप्रक्रियेला येत्या शुक्रवारपासून होणार सुरुवात ३० हजार शिक्षकांची पहिल्या टप्प्यात भरती

जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न सुटला असून शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी पवित्र ही वेबसाईट शुक्रवारपासून कार्यरत होणार आहे. तर त्यानंतरच्या पुढच्या १५ दिवसात प्रत्यक्ष भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. संध्याकाळी उशीरा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर …

Read More »

आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन अप्पर वर्धा बाधितांच्या मागण्यांबाबत १५ दिवसांत बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रसारमाध्यमांशी बोलताना आश्वासन

अप्पर वर्धा प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसन व अनुषंगिक मागण्यांबाबत येत्या १५ दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यासाठी या बाधित गावातील जमीन, पुनर्वसनाचे पर्याय यांबाबत सर्वंकष आढावा घेऊन माहिती तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रकल्प बाधितांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठकीत …

Read More »

कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी ५२४ कोटींचा आराखडा सादर करा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश

राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या ५२४ कोटींच्या निधीच्या खर्चाचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. राज्याच्या अर्थसंकल्पात सोयाबीन व कापूस पिकांसाठी सन २०२२-२३ ते …

Read More »

काँग्रेसचा आरोप, पराभवाच्या धास्तीने पछाडल्यानेच मोदी सरकारला महागाईची जाणीव ४५० रुपयांचा सिलेंडर ११५० रुपये करुन २०० रुपये कमी करणे ही मोदी सरकारची लुटारु वृत्ती

महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदी सरकारला अचानक महागाईची जाणीव झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपये व उज्ज्वला योजनेतील सिलिंडरमागे ४०० रुपये कमी करण्याचा निर्णय घेऊन जनतेला दिलासा देत असल्याचा ढोल बडवला जात आहे पण पाच राज्यातील विधानसभा निवडणुका व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पराभव …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा निर्णयः नीति आयोगाच्या मदतीने मुंबईचा आर्थिक कायापालट मास्टर प्लॅन सादर करणार, राज्यातर्फे वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम, नोडल अधिकारी नेमणार

मुंबई महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्यासंदर्भात नीती आयोगासमवेत आज बैठक झाली. राज्य शासन यामध्ये नीति आयोगाशी संपूर्ण समन्वय ठेवेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मंत्रालयात नीति …

Read More »

पुणे येथील वीर धरणबाधितांसाठी प्रस्ताव सादर करा प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याचा प्रस्ताव आराखड्यासह सादर करावा

पुणे जिल्ह्यात नीरा नदीवर बांधण्यात आलेल्या वीर धरणामुळे बाधित झालेल्या खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव संबंधित यंत्रणेने आराखड्यासह सादर करावा, तसेच राज्यातील याविषयीचे अन्य प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आज येथे दिले. खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा देण्याबाबत आयोजित बैठकीत …

Read More »

राज्यात जपानच्या धर्तीवर ऑलिम्पिक भवन उभारणार क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची घोषणा

खेळाडूंना जागतिकस्तरावर उत्तम कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडा धोरणात बदल करणार असून, जपानच्या धर्तीवर राज्यात लवकरच ऑलिम्पिक भवन उभारणार असल्याची घोषणा क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी केली. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी (मुंबई शहर) यांच्यावतीने …

Read More »

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण समितीने घेतला राज्याचा आढावा राज्याच्या योजनांचा घेतला आढावा

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण विषयक संसदीय समितीने आज राज्याच्या अनुसूचित जाती, जमातीबाबत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला. ही बैठक खासदार किरीट सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती कल्याण संसदीय समितीची हॉटेल ताज येथे आज बैठक झाली. या बैठकीस समितीचे सदस्य उपस्थित होते. …

Read More »

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता गतीने वितरित करा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, कृषी संचालक दिलीप झेंडे, …

Read More »

आता अधिकृतरित्या मुंबई महाराष्ट्र सरकारच्या प्रशासनाकडून दिल्लीच्या ताब्यात नीति आयोगाकडे मुंबईच्या आर्थिक विकासाचे कंत्राट

देशाच्या आर्थिक विकासात मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व नेहमीच केंद्रातील कोणत्याही सरकारने कधी नाकारले नाही. मात्र मुंबईसह राज्यात कोणत्या स्वरूपाची आर्थिक विकास केंद्रे, पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात याबाबतचा निर्णय जरी केंद्र सरकारकडून घेण्यात येत असे. मात्र त्यातील धोरणात्मक आणि विकासात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी नेहमीच ही राज्य सरकारचा वाटा महत्वाचा राहिला आहे. त्यामुळे …

Read More »