महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे. यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरुपात काम करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली . छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान …
Read More »दत्तात्रय भरणे यांचा विश्वास, जीएसटी कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना कररचनेतील कपात, मध्यस्थांवरील नियंत्रण आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळेल
शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी जीएसटी परिषदेने कृषी यंत्रसामग्री, साधने खते व बियाणे अशा विविध गोष्टींवरील कर कपात करत शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी दिली आहे. कररचनेतील कपात, मध्यस्थांवरील नियंत्रण आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळणार असून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला या निर्णयामुळे चालना मिळणार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे …
Read More »सेवेतील पोलीस शिपायांना पीएसआय होण्याची विभागीय परीक्षेद्वारे संधी मर्यादीत विभागीय परिक्षेद्वारे पीएसआय होण्याची संधी
राज्याच्या पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक अर्थात पीएसआय पद महत्त्वाचे आहे. या पदाला मोठी प्रतिष्ठाही आहे. त्यामुळे राज्यातील अनेक तरूणांचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेद्वारे सरळ सेवेने पीएसआय होण्याचे स्वप्न असते. या स्पर्धा परीक्षेद्वारे पीएसआय होण्याची संधी न मिळाल्यास पोलीस दलात शिपाई पदावर भरती होऊन विभागीय परीक्षेद्वारे पीएसआय पदावर जाण्याची महत्वांकांक्षा …
Read More »अजित पवार यांची माहिती, शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती स्तरापर्यंत बक्षीस योजना
महाराष्ट्र शासनाने चालू आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक नियोजनाखाली तब्बल २२ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, त्यातील मोठा हिस्सा जिल्हा परिषदेमार्फत थेट गावपातळीपर्यंत पोहोचतो. ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक व सुयोग्य पद्धतीने वापरून गावांचा सर्वांगीण विकास साधावा. भारताचा आत्मा खेड्यांत आहे. खेडी समृद्ध झाली तर देश समृद्ध होईल, असे …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, फडणवीस सरकारमध्ये परदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क बंगळुरूला चालल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान सत्यच
थेट परदेशी गुंतवणूकीत यावर्षीच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत कर्नाटकात अधिक आली असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. फडणवीस सरकारच्या अगोदरच्या कालावधीतही कर्नाटक असाच एकदा पुढे गेला होता. यशाचे श्रेय घेताना फडणवीस पुढे य़ेतात तसेच अपश्रेय ही पुढे येऊन घ्यावे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ राज्य सरकार आणि आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशन संयुक्तपणे राबविणार
राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फार्मर कप’ या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाची उच्चस्तरीय समिती व पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यात २०२६-२७ या वर्षासाठी १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, मग मागासवर्गीयांना ४२% आरक्षण देणार का? आरक्षणाच्या नावाखाली मराठा व ओबीसी समाजात भांडण लावले, फडणवीसांच्या शब्दावर किती विश्वास ठेवणार?
राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासन आदेश काढला आहे. सरकार जर हैदराबाद गॅझेट लागू करणार आहे तर मग तेलंगणा सरकारने जशी जातनिहाय जनगणना करून त्यांच्या राज्यातील ओबीसी समाजाला ४२% आरक्षण दिले तो तेलंगणा सरकारचा आदर्श देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का? असा प्रश्न महाराष्ट्र …
Read More »रईस शेख यांचा इशारा, अमेरिकन टॅरिफमुळे निर्यातीत घट, पॉवरलूम क्षेत्रावर संकट ऑर्डर कमी होत चालल्याने पॉवरलूम बंद पडण्याची भीती
अमेरिकेच्या ५०% टॅरिफचा सर्वात जास्त फटका वस्त्रोद्योग क्षेत्राला बसल्यानंतर, भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पॉवरलूम उद्योगावरील परिणाम कमी करण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती मागितली आहे. भारताच्या कापड निर्यातीत याचे योगदान ६० टक्के आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात आमदार रईस …
Read More »मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल
मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ईद-ए-मिलाद निमित्त सार्वजनिक सुट्टी यापूर्वी ५ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही सुट्टी शुक्रवार ५ सप्टेंबर ऐवजी सोमवार ८ सप्टेंबरला असणार आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवार दि. ५ सप्टेंबर ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे. राज्यात बंधुता …
Read More »व्लादिमीर पुतीन यांचा इशारा, भारत चीन देशांवर दबाव आणू शकत नाही अप्रत्यक्षरित्या डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी पाश्चिमात्य वर्चस्वाविरुद्ध इशारा दिला, भारत आणि चीन हे जागतिक आर्थिक महाकाय देश आहेत ज्यांच्याशी तिरस्काराने बोलता येत नाही. “आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातून, सर्वांना समान अधिकार असले पाहिजेत, समान पदांवर असले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत भारत आणि चीनसारखे आर्थिक महाकाय देश आहेत. क्रयशक्तीच्या बाबतीत आपला देश जगातील …
Read More »
Marathi e-Batmya