Editor

“आयडॉलॉजीकल करोना”च्या विरोधात गांव, वार्ड तिथे संविधान घर ! चाळीस विचारवंतांचे एकजुटीचे आवाहन गणेश देवी,आढाव, आंबेडकर, रावसाहेब कसबे, फादर दिब्रिटो यांचा सहभाग

मुंबई: प्रतिनिधी सेवादलाच्या ऐंशीव्या पुनर्घटनादिनी देशाला संबोधताना, भारतरत्न अमर्त्य सेन यांनी स्किझोफ्रेनिया सरकारशी लढताना भारत हा भरपूर प्रतिकार शक्ती असलेला आणि उत्पादनाची कमाल क्षमता असलेला देश असल्याचं म्हटलं आहे. अमर्त्य सेन आणि राजमोहन गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे गांधी आणि आंबेडकर यांच्या रस्त्यानेच अपार शक्यतांचा, अपार आशा, उमेद आणि संभावनांचा हा देश या …

Read More »

पवार-किशोर भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट, मलिक काय म्हणाले… प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव पवारसाहेबांसमोर मांडला

मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शरद पवार- प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबत अधिकृत भूमिका मांडली. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि …

Read More »

प्रशांत किशोर- शरद पवार यांची भेट: नव्या निवडणूक रणनीतीची नांदी पण काहीकाळ वाट पहावी लागणार

महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख ही खरी तर दिल्लीच्या तक्ताला धडका मारणारा नेता अशीच आहे. त्यानंतर गुढ राजकिय व्यक्तीमत्व आणि बदलत्या परिस्थितीवर मात करत स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवून ठेवणारा नेता, दूरदृष्टीचा नेता म्हणून ही सबंध देशभरात ओळखले जाते. निवडणूकीच्या आधीच राज्यात काय वारे वहातेय अंदाज …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी सर्व सरपंचांचा माझे सहकारी असा उल्लेख करून पुढे म्हणाले की, आपण सर्वांनी गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अतिशय चांगले काम केले आहे, त्यासाठी खुप नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, मी तुम्हाला सुचना देण्यापेक्षा तुम्ही केलेल्या कामातूनच मला खुप चांगली माहिती मिळाली आहे. ज्याचा राज्यभरासाठी उपयोग करता येईल. आपण सर्वजण जनहितासाठी समाजमाध्यमांचाही खुप …

Read More »

अजित पवारांनी फेसबुकद्वारे साधला जनतेशी संवाद, दिली ही आश्वासने ‘महाराष्ट्रवादी चर्चा’ या नव्या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: प्रतिनिधी कोरोना काळात जनतेचे आरोग्य चांगलं राहण्यासाठी सरकारच्या सर्व लोकांनी लक्ष घातले. सरकारने केलेल्या आवाहनाला जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरकारने कोरोना रुग्णांच्या आकडेवारीबाबत कुठेही लपवाछपवी केली नाही. लोकांना लस कशी मिळेल आणि विशेष म्हणजे दोन डोस कसे देता येईल हा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. परंतु कोट्यवधी लोकसंख्येचा विचार करता …

Read More »

मुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालचा समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात आजपासून १५ जून पर्यंत पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देत मुंबई कोकणसह पुणे, परभणी, सातारा, हिंगोली उस्मानाबाद, नांदे़ड लातूर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग …

Read More »

कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठीच भाजपाचे योगी विरूध्द मोदीचे चित्र राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी काही दिवसापासून मोदी आणि योगी यांच्यामध्ये मतभेदाचे वातावरण असल्याच्या बातम्या देशात आणि उत्तर प्रदेशमध्ये येत आहेत. परंतु कोरोना काळातील अपयश झाकण्यासाठी भाजपची ही ठरवून केलेली रणनीती असल्याची पोलखोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. कोरोना काळात उत्तरप्रदेशमधील गंगा नदीत कोरोना बाधित लोकांचे मृतदेह फेकण्यात …

Read More »

राज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही-आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यापूर्वीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रिक्नस्लेशन अर्थात ताळमेळ प्रक्रियेत आणखी …

Read More »

चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता तोपर्यंत दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यामध्ये आहे, अशी उपरोधिक उपमा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नामोल्लेख टाळत उत्तर दिले. मुंबईत बुधवारी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून लोकांचे प्रचंड हाल झाले. त्याविषयी …

Read More »

राज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी  राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येईल.  “हेरिटेज ट्री” ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठीचा …

Read More »