Editor

चार वर्षात भाजपच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा कमाविला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप

दर्यापूर : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करून जनतेची क्रूर थट्टा करत आहेत. चार वर्ष भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा कमावल्याने भाजपचे मंत्री मस्तवाल झाले आहेत. आगामी निवडणुकीत पराभवाची धूळ चारून जनता भाजपच्या नेत्यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे सरकारला ५० हजारांचा दंड भारत-पाक युध्दातील जवान असूनही जमिनीच्या प्रतिक्षेत

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शहीद आणि जवानांच्या नावावरून राजकारण करणाऱ्या राज्यातील भाजप सरकारच्या गलथान कारभाराचा फटका एका भारत-पाक युध्दात मर्दमुकी गाजविणाऱ्या सैनिकाला बसला आहे. तसेच या कारभारामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजार रूपयांचा दंड ठोठावून तीन महिन्यात या शुरवीर सैनिकाला जमिन देण्याचे आदेश सरकारला देवून ११ महिने …

Read More »

जागतिक शांततेसाठी बुद्धविचारांच्या प्रसाराची आवश्यकता राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी शांतता, सौहार्द, ज्ञान आणि करुणा या तत्त्वज्ञानाचा आधार असलेला बौद्ध धर्म हा भारताच्या महान आध्यात्मिक परंपरांचा प्रसारक आहे. आजची जागतिक परिस्थिती पाहता जगाला बुद्धविचारांची आवश्यकता असल्याचे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केले. के. जे. सोमय्या सेंटर फॉर बुद्धीजम स्टडीजच्या २५ व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘एम्बडींग कंम्पॅशन : अवलोकितेस्वरा इन …

Read More »

बाबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर महाराष्ट्रासह देशातील लाखो आंबेडकरी अनुयायांची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी देशातील तमाम मागासवर्गीयांच्या ७० हून अधिक पिढ्यांच्या जीवनात प्रकाशाची ज्योत आणि स्वाभिमानाचे अंकुर फुलविणाऱे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटल्याचे चित्र चैत्यभूमी आणि दादर परिसरात पाह्यला मिळाले. काल रात्रीपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातील अनुयांयाबरोबरच देशातील झारखंड, छत्तीसगड, बिहार आणि राजस्थान राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे ना टेंडर ना वर्क ऑर्डर सरकार दिशाभूल करत असल्याचा प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी २०१५ मध्ये बिहारच्या निवडणूका डोळयासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते. तीन वर्षात हालचाल होत नाही…स्मारकाचे डिझाईन फायनल होत नाही…टेंडर काढण्यात येत नाही…वर्क ऑर्डर निघत नाही… ६ डिसेंबर आले म्हणून एखादया अधिकाऱ्याला न्यायचे आणि खोदकाम सुरु करायचं आणि लोकांची दिशाभूल …

Read More »

भाजप नावाच्या कॅन्सरला मुळापासून उघडून टाका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे आवाहन

अमरावती: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा देशाला जडलेला कॅन्सर आहे. आगामी निवडणुकांत हा कॅन्सर मुळापासून उखडून टाकला नाही तर देशाचे वाटोळे होईल. या देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी भाजपरूपी कॅन्सरवर शस्त्रक्रिया करू त्याला मुळासकट उखडून टाकले पाहिजे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. …

Read More »

मानव-वन्यजीवांमधील संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवे धोरण धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी राज्याचे स्वतंत्र धोरण निश्चित करावे, त्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना केली जावी,  असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य वन्यजीव मंडळाची १४ वी बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया, आमदार प्रभूदास …

Read More »

देह व्यापारात बळी पडलेल्या महिलांना जीवन परिवर्तनासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देणार वीर रणरागिणी महिला मेळाव्यात केंद्र निरिक्षक आय.एम.लोहार यांचे आश्वासन

देह व्यापारातील बळी महिलांना जीवनाची नवी उमेद मिळण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन जीवन परिवर्तन  करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कटिबट्ट असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा निरीक्षक आय.एम.लोहार  यांनी केले. जागतिक एच. आय. व्ही./एड्स सप्ताहनिमित्त  स्नेहालय संचलित स्नेह्ज्योत प्रकल्प – १ च्या वतीने देह व्यापारातील बळी महिलांसाठी जिल्हास्तरीय  ‘वीर रणरागिणी’ महिला मेळाव्याचे आयोजन …

Read More »

जमिन विक्री घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार सुरेश जैन हाजीर हो १९ डिसेंबर ला जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे जिल्हा न्यायालयाचे आदेश

जळगांव : प्रतिनिधी घरकूल योजना राबविताना आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी यापूर्वी तुरुंगवास भोगलेल्या सुरेश जैन यांच्या अडचणीत आता नव्याने भर पडली आहे. शहरातीलच रेल्वेलगतच्या जमिनीच्या नकाशात फेरफार करून सदर जमिन विकल्याप्रकरणी खान्देश बिल्डरच्या संचालकांसह माजी आमदार सुरेश जैन यांना जळगांव जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. शहरातील दूध फेडरेशन आणि रेल्वे …

Read More »

भाजप-शिवसेना सरकार हे राज्यावरील सर्वात मोठे विघ्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

कळंब, यवतमाळ: प्रतिनिधी देशातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकार हे सर्वात मोठे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठीच काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून केंद्रातील व राज्यातील सरकार घालवल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी …

Read More »