मुंबई : प्रतिनिधी माणसाने माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे. मानवाचा जन्म प्रेम करण्यासाठी मिळाला आहे. जात-पात ही मानवानेच निर्मिली आहे. आज भारतातून पोलिओ हद्दपार झाला म्हणून आपण मिरवतो, तशी जात नाही का हद्दपार होऊ शकत? असा सवाल करीत राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांनी आपल्या मनातील भावना प्रगट केल्या. ‘शिवाजी …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आमदारांचे तीन तास मंत्रालयातच ठिय्या आंदोलन आसिफ शेख, अब्दुल सत्तार, अबु आझमी, इम्तियाज जलिल, वारीस पठाणचा समावेश
मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद दंगलीतील प्रमुख संशयितांचे व्हीडीओ फुटेज पुराव्या दाखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी काँग्रेस, समाजवादी पार्टी, एमआयएम आदी पक्षाच्या पाच मुस्लिम आमदारांनी वेळ मागितला. मात्र मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी भेटीची वेळ नाकारल्याने काँग्रेसचे आमदार आसिफ शेख, अब्दुल सत्तार, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, वारीस पठाण …
Read More »भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी तीन जागांचे भवितव्य पेटी बंद विधान परिषदेसाठी ९९.८१ टक्के मतदान
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधून निवडूण येणाऱ्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. या सहा जागांवर भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी तीन उमेदवार उभे करण्यात आले. त्यामुळे तीन जिल्ह्यांच्या एका मतदारसंघानुसार तीन मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यातच या निवडणूकीकरीता ९९.८१ टक्के मतदान झाले. त्यामुळे या …
Read More »`एक देश, एकच शिधापत्रिका’ मोहिमेसाठी प्रयत्न अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शिधावाटप केंद्रांवर ई-पॉसद्वारे धान्य वितरण प्रणाली लागू केल्यामुळे राज्यात एखादा शिधापत्रक धारक कोठेही एकदाच धान्य घेऊ शकतो. त्यामुळे राज्यातील एखाद्या व्यक्तीला एकच शिधापत्रक बाळगता येणे शक्य आहे. संपूर्ण देशात हीच पद्धत अंमलात यावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे देशभरात एक नागरिक, एकच शिधापत्रिका अंमलात येऊ शकेल, …
Read More »फळपिकांचा क्रॉपसॅप योजनेत समावेश करण्याचा निर्णय ४१ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद केल्याची कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाचे दृष्टीने एकत्रीत क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार २०१८-१९ या चालू वर्षापासून सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, आंबा, डाळींब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या प्रमुख पिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकत्रित कीड-रोग सर्वेक्षण …
Read More »राज्यातील शेतकऱ्यांना अचूक हवामानाची सूचना देणार ‘महावेध’ २०६० स्वयंचलित हवामान यंत्रे कार्यान्वित
मुंबई : प्रतिनिधी लहरी हवामानामुळे नेहमीच नुकसान सहन करीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी योजना राज्य सरकारने कार्यान्वित केली आहे. ही अचूक माहिती मिळण्याकरीता ‘महावेध’ ही योजना सुरु करण्यात आली असून या यंत्रणेमार्फत आता राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला हवामानाची अचूक माहिती, अंदाज उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना पिकांचे योग्य व्यवस्थापन आणि नुकसान टाळण्यासाठी मदत …
Read More »राज्यात भाजप- शिवसेना सरकारची एकात्मिक फसवणूक योजना सुरु काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप
पालघर : प्रतिनिधी गेली चार वर्षात विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळेच मृत व्यक्तींचा वापर करण्याची वेळ भाजप आणि शिवसेनेवर आली आहे. एके ठिकाणी पालघर जिल्ह्याचा विकास हा सत्ताधा-यांमुळे आयसीयुमध्ये मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे. तर दुसरीकडे भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष ऊर बडवून मतांचा जोगवा मागत असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र …
Read More »लुटलेले हजारो कोटी वापरा पण पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी भाजप-शिवसेनेच्या केंद्र सरकारने आजवर ग्राहकांच्या खिशातून लुटलेल्या हजारो कोटी रूपयांमधून अनुदान द्यावे आणि पेट्रोल-डिझेलची महागाई कमी करावी, अशी मागणी करत पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दररोज वाढणार्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींसंदर्भात रोष व्यक्त करताना ते म्हणाले की, सततच्या भाववाढीसाठी केंद्र सरकारने सबबी सांगणे …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात मंत्रालयासमोर निदर्शने सरकारच्या नावाने भोपळा फोड आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजप सरकारने रोजगार उपलब्ध करून देणार, उद्योग आणण्याच्या घोषणा दिल्या. मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकारने दिलेल्या नसल्याच्या निदर्शनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी करत भोपळा फोड आंदोलन केले. त्यामुळे प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. दरवर्षी बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणार, …
Read More »आदीवासी विद्यार्थी आश्रमशाळा असूनही मुलभूत सुविधांपासून वंचित जव्हार, डहाणू, शहापूर तालुक्यातील आश्रमशाळांकडे सरकारचे दुर्लक्ष
मुंबई : कविता वरे ग्रामीण व आदिवासी भागात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अनुदानित व शासकीय आश्रमशाळा वसलेल्या आहेत. ह्या भागात आश्रमशाळा आदिवासी विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे मुख्य माध्यम आहे. ह्या भागातील सामान्य विद्यार्थी हे ह्या शाळांमधून शिक्षण घेताना दिसून येतात. मात्र राज्य शासनाचा ह्या आश्रमशाळांमधून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आजही खेळायला क्रिंडागणे, …
Read More »
Marathi e-Batmya