सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणीसह अॅनिमिया निर्मूलन, बाल आरोग्य, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्यसेवा, शालेय विद्यार्थ्यांची तपासणी आणि उपचारांचा पाठपुरावा यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. आरोग्य संस्थांतील सेवांचे नियमित संनियंत्रण, जनआरोग्य समित्यांचा सहभाग, रुग्णवाहिका सेवेचे बळकटीकरण तसेच वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता यावर विशेष भर देण्यात यावा असेही …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री ते पंतप्रधान २५ वर्षात देशासाठी काय ‘दिवे’ लावले ? नरेंद्र मोदींनी आधी गुजरातची वाट लावली आणि नंतर देशाला २५ वर्षे मागे नेले, हा वाढदिवस नाही तर ‘काळा दिवस’ !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जिवनात २५ वर्ष पूर्ण केली म्हणून त्यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करा, असे आवाहन भाजपाकडून करण्यात येत आहे. नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांचा व त्यांच्या पक्षासाठी मोठा असेल पण मुख्यमंत्री ते पंतप्रधान म्हणून २५ वर्षात त्यांनी देशासाठी काय ‘दिवे’ …
Read More »महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले कृषी विभागाकडून अधिसूचना जारी
महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, अधिनियमांतर्गत कार्यवाहीसाठी ग्रामपंचायत क्षेत्रासाठी सहाय्यक कृषी अधिकारी आणि नगरपंचायत क्षेत्रासाठी कृषी अधिकारी (विस्तार) यांची पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संबंधित क्षेत्रासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांची …
Read More »जयकुमार रावल यांची माहिती, कृषी पायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या संधी ‘मॅग्नेट ॲग्रीबिझनेस इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर मीट’चे पणनमंत्री रावल यांच्या हस्ते दिमाखदार उदघाटन
महाराष्ट्राला केवळ कृषी उत्पादन करणारे राज्य न ठेवता कृषीमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि निर्यात करणारे आघाडीचे राज्य बनविण्यासाठी ‘मॅग्नेट २.०’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. केळी, डाळिंब, आंबा, लिंबूवर्गीय फळे, काजू आणि हळद या सहा कृषी उत्पादनांच्या समूहांसाठी एक हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीची संधी निर्माण केली जाणार असून, खासगी क्षेत्राने या प्रक्रियेत …
Read More »एफडीए प्रमुख तुकाराम मुंडे यांचे आता रुग्णालयाच्या उपकरणे आणि औषधांच्या किंमतीकडे लक्ष उपकरणे आणि औषधांच्या किंमतीत अनेक पटींनी वाढ
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) प्रमुख तुकाराम मुंडे यांनी रुग्णालयातील उत्पादने आणि औषधांच्या किमतींमधील प्रचंड तफावतीकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या मूळ व्यापार-किमतीपेक्षा (trade price) रुग्ण अनेक पटींनी (शेकडो किंवा हजारो टक्के) अधिक रक्कम मोजत असू शकतात, आणि त्यांना त्या उत्पादनांची प्रत्यक्ष किंमत …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे शालेय मित्र असगर अली वोराची जमिन आमदार नरेंद्र मेहता यांनी परत केली मुख्यमंत्री फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्या बरोबरच्या बैठकीत जागा परत दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शालेय मित्र असलेले ८१ वर्षीय असगर अली वोरा यांना, अनेक दशकांपासून सुरू असलेल्या मालमत्ता वादात पंतप्रधानांकडे हस्तक्षेप मागितल्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर येथील त्यांची जमीन भाजप आमदाराकडून परत मिळाली. मंगळवारी, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जाहीर केले की ते वादग्रस्त भूखंडाचा ताबा सोडत आहेत आणि त्यासाठी मिळालेली …
Read More »पाकिस्तानच्या नौदल जहाजाची भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक इस्लामाबादच्या उच्चायुक्तांना बोलावून घेतले
आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात पाकिस्तानच्या नौदलाच्या जहाजाची भारतीय नौदलाच्या युद्धनौकेशी धडक झाल्यानंतर नवी दिल्लीने इस्लामाबादच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला (उच्चायुक्तांना) बोलावून घेतले आहे. याआधी १५ वर्षांपूर्वी ‘गल्फ ऑफ एडन’मध्ये अशाच प्रकारच्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला होता. मात्र, या ताज्या घटनेत भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे कोणतेही संरचनात्मक नुकसान झाले नाही किंवा त्यावरील कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत …
Read More »अर्थ मंत्रालयाची स्पष्टोक्ती, शुल्क आकारणीवर बाहेरील देशाचा दबाव नाही विरोधकांच्या आरोपावर वित्त मंत्रालयाची भूमिका
युपीआय (UPI) व्यवहारांवर ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (MDR) लागू करण्याचा निर्णय परदेशी दबावामुळे घेण्यात आला, या आरोपांचे केंद्र सरकारने बुधवारी खंडन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खूश करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या आरोपांवर स्पष्टीकरण देताना अर्थ मंत्रालयाने सांगितले की, भारताचे युपीआय धोरणात्मक निर्णय “स्वतंत्रपणे” घेतले जातात …
Read More »राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदी यांना आवाहन, तुम्हाला कणा आहे, तुम्ही अमेरिकेला शरण जाऊ नका युपीआय आणि रुपे सिस्टीम शुल्क आकारणी मागे घ्या
केंद्र सरकारने युपीआय आणि रुपे डेबिट कार्डवरून व्यवहारावर दोन हजाराची मर्यादा आणत त्यापुढील व्यवहारावर एमडीआर शुल्क आकारणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यावरून काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना आवाहन करत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सतत अमेरिकेला शरण जाऊन जाऊ नका, तुम्हाला कणा आहे. ताट …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे सात महत्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री फडणवीस हे होते
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना, अहिल्यानगर मधील हरेगांव मळ्याच्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळणार, महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष (महा-टॅक) स्थापन करणार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला भाडेपट्टयाचे मुद्रांक शुल्क माफ, महाराष्ट्र …
Read More »
Marathi e-Batmya