केंद्र सरकार २०० हून अधिक सरकारी कंपन्यांची सुधारणा करण्याच्या तयारीत आहे, त्यांचे नफा वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून, त्यांच्या खाजगीकरण योजनेतून बदलाचे संकेत आहेत, ज्याने गती मिळविण्यासाठी संघर्ष केला आहे. रॉयटर्सच्या अहवालात दावा केला आहे की २३ जुलै रोजी होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा एक भाग असणारी ही योजना, कंपन्यांच्या मालकीच्या कमी वापरलेल्या जमिनीचे …
Read More »सीसीआयचा आरोप, अॅपल ऑपरेटींग सिस्टीममुळे बाजारावर नियंत्रण ठेवतेय अहवालात ऑपरेटींग सिस्टीमच्या गोपनीयतेवरून ठपका
कॉम्पिटिशन वॉचडॉग कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने म्हटले आहे की टेक दिग्गज ऍपलने “अपमानास्पद वागणूक आणि पद्धतींमध्ये” गुंतून त्याच्या iOS ऑपरेटिंग सिस्टमसाठी ॲप्स मार्केटमध्ये आपल्या वर्चस्वाचा गैरफायदा घेतला. CCI ने २०२१ मध्ये त्याची तपासणी सुरू केली, ज्यामध्ये ॲपलने विकसकांना ॲपमधील खरेदी प्रणालीचा वापर करण्याच्या आदेशावर लक्ष केंद्रित केले. ही …
Read More »जुलै महिन्यात कर संकलनात २४ टक्के वाढ ५.७४ लाख कोटी रूपये जमा
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शुक्रवारी FY २०२४-२५ साठी ११ जुलै २०२४ पर्यंत थेट कर (DT) संकलनाचा डेटा जारी केला. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन २४.०७% ने वाढून ५.७४ लाख कोटी रुपये झाले आहे. FY23 मध्ये निव्वळ संकलन ४.८० लाख कोटी रुपये होते. यामध्ये २.१ लाख कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर आणि ३.४६ …
Read More »मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगाल मध्ये आम्ही काँग्रेस आणि …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट, तुमच्याकडचीही मतं आणली, पुढे आम्हीच सत्तेत महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवन' उभारणार
विधान परिषदेच्या निवडणूकीनिमित्ताने १२ उमेदवार उभा करत महाविकास आघाडीचे मोठे मोठे नेते म्हणत होते की, आमचा १२ उमेदवार निवडूण येणार म्हणून, पण या निवडणूकीत आम्हाला मिळणारी मते आम्ही मिळवलीच पण महाविकास आघाडीची मतंही आम्ही खेचून घेत ती आमच्याकडे आणली. त्यामुळे आता जी परिस्थिती आज दिसून आली. तीच परिस्थिती येणाऱ्या आगामी …
Read More »नगरपरिषद व नगरपंचायतीमधील पोटनिवडणुकीसाठी ११ ऑगस्टला मतदान राज्य निवडणूक आयोगाची माहिती
विविध नगरपंचायती व एका नगरपरिषदेतील एकूण ११ सदस्य पदांच्या रिक्त जागांसाठी आणि हातकणंगले (जि. कोल्हापूर) नगरपंचायतीच्या थेट अध्यक्षपदाच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ११ ऑगस्ट २०२४ रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. खालापूर, पाली (जि. रायगड), निफाड, सुरगाणा (जि. नाशिक), बोदवड (जि. जळगाव), धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. (जि. नंदुरबार), …
Read More »जयंत पाटील यांचा पराभव वगळता महायुती-महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी काँग्रेसची सात मते फुटल्याची चर्चा
विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने अकराव्या जागेसाठी जबरदस्त चुरस वाढली. अकराव्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार की दोघांना आपापसात झुंज द्यावी लागणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पुरस्कृत जयंत पाटील यांचा पराभव झाला. …
Read More »वाहन योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क स्थगित आरटीओची प्रसिध्दी पत्रकान्वये माहिती
परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर प्रतिदिवस ५० रुपये विलंब शुल्क आकारण्याच्या कार्यवाहीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सर्व वाहनधारकांनी याची नोंद घेत आपापली वाहने योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन परिवहन आयुक्त …
Read More »रमेश चेन्नीथला यांचा इशारा, लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका… विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोमाने काम करा
काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवर मागील काही दिवसात टीका होत होती परंतु लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलले आणि आज महाराष्ट्रात काँग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष बनला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व महाविकास आघाडीला चांगले यश मिळालेले आहे पण पुढील लढाई सोपी नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी मेहनत करावी लागणार आहे. लोकसभा जिंकलो …
Read More »प्रकाश आंबेडकर म्हणाले, मनुस्मृती शिकवण्याचा प्रस्ताव फेटाळला नसता, तर … कुलगुरू कार्यालयासमोर प्रत जाळली असती
दिल्ली विद्यापीठाने विधी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना जातीयवादी, महिलाविरोधी मनुस्मृती शिकवण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. मला या निर्णयाचा आनंद असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर असे काही घडले नसते, तर मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलांवर पाऊल ठेवून दिल्लीत …
Read More »
Marathi e-Batmya