Breaking News

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपाच्या इंडिया आघाडीचे जागा वाटप जाहीर

मागील काही दिवसांपासून देशातील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाल्यापासून आणि जनता दल संयुक्तचे नितीश कुमार यांच्यापासून ते ममता बॅनर्जीपर्यंत अनेक जण इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे इंडिया आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येते की काय असे वाटत असतानाच उत्तर प्रदेश …

Read More »

अजित पवार यांचे निर्देश, काजूबोंड रसावर प्रक्रियेसाठी ब्राझीलसोबत सामंजस्य करार करा

कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आणि काजू प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या माध्यमातून काजूबोंड रसावर प्रक्रिया करण्याकरिता ब्राझीलचे तंत्रज्ञान वापरण्यात यावे. त्यासाठी ब्राझील देशाबरोबर सामंजस्य करार करावा. काजू प्रक्रिया उद्योगांना राज्य वस्तू व सेवा कराचा परतावा ५ मार्चपूर्वी द्यावा आणि केंद्रीय वस्तू व …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, पुण्यातल्या ४ हजार कोटींच्या ड्रग्जचे गुजरात कनेक्शन ?

पुण्यात तीन दिवसात तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. गुजरातमधील मुंद्रा बंदरातून हजारो टन ड्रग्जचा धंदा होत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. मुंद्रा बंदराचा मालक व भाजपाचे ‘आका’ यांचे काय संबंध आहेत, हे जगजाहीर आहे. महायुती सरकार राज्यातील तरुणांना धर्माचा अफू व ड्रग्जचे …

Read More »

शरद पवार यांचा आरोप, व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम सुरुय…

सध्या कोल्हापूर आणि पुणे दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार याच्या गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सध्या सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन आणि प्रसारमाध्यमात दाखविण्यात येणाऱ्या बातम्यांच्या प्रश्नीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर खोचक टीका केली. कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी केले उद्घाटन मुंबईतल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वगुणसंपन्न राजे होते. त्यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच शासन काम करत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कुर्ला पश्चिम येथील संत गाडगे महाराज विद्यालय येथे उभारण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, … शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची नरेंद्र मोदींची तयारी !

शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचा (MSP) कायदा करावा या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. हे शेतकरी दिल्लीत पोहचू नयेत म्हणून हुकूमशाही मोदी सरकारने रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, सिमेंटच्या भिंती उभ्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी मोदी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते. आंदोलक शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तयारीही …

Read More »

शेतकरी आंदोलन पुन्हा पेटले; शंभू व खंजौरी बॉर्डरवर लाठीचार्ज, तर केंद्राकडून चर्चेचा प्रस्ताव

देशातील शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादीत मालाला कायदेशीर किमान आधारभूत किंमत मिळावी या प्रमुख मागणीसाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा दिला. मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश बंदी केल्याने शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनी शंभू बॉर्डर आणि खंजुरी बॉर्डरवर ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यातच नुकतेच मागील आठवड्यात केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, … सरकार निवडणुकांची वाट पाहतेय का?

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी पूर्वीच्या घोषणेप्रमाणे ३१ मार्चपर्यंत कायम ठेवली आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. त्यात कोणताही बदल केंद्र सरकारने केला नाही. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असून केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले …

Read More »

ज्येष्ठ रेडिओ स्टार निवेदक अमिन सायानी यांचा आवाज आता कायमचा थांबला

“भाईओ और बेहनो आप सबका …” असा गोड आणि हवाहवासा वाटणारा ज्येष्ठ निवेदक अमिन सायानी यांचा अखेर कायमचा शांत झाला. अमिन सायानी यांना काल हृदयविकाराचा झटका आल्याने मुबंईतील एच.एन. रिलायन्स रूग्णालयात काल संध्याकाळी २० फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच संध्याकाळी ७ च्या सुमारास प्राणज्योत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी आरक्षण फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक

महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली असल्याची प्रतिक्रीया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून आज सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू …

Read More »