Breaking News

महाविकास आघाडीचे वंचितला निमंत्रण, पण प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

आगामी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राच्या प्रमुख विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला सहभागी करणार की नाही यावरून उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. त्यातच महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी निवडणूका जाहिर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर …

Read More »

अलका लांबा यांचा आरोप, ‘बेटी बचाओ,…’चा नारा देणारे भाजपाच्या राज्यातच अत्याचारी मोकाट

स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाने पंचायत राजमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन राजकारणातील महिलांचा सहभाग वाढवला आहे. महिलांचा राजकारणातील सहभाग वाढवण्याचा काँग्रेस पक्षाचा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये ४० टक्के महिलांना उमेदवारी देऊन काँग्रेसने एक ऐतिहासिक पाऊल उचलले होते. महिला आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी केंद्रातील भाजपा …

Read More »

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना, कॉर्पस फंड आणि अडचणीत सापडलेल्या वेठबिगारांच्या मुक्तेतेसोबतच त्यांना तातडिची आर्थिक मदत देण्यात येत आहे. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये राज्यातील एकूण १९१ वेठबिगारांची मुक्तता करण्यात आली असून त्यातील १०४ वेठबिगार हे कातकरी …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणारे दोन मंत्री आता कुठे लपले?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभिमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच असे जाहीरपणे सांगितले तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेले नाही. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत. …

Read More »

मनोज जरांगे पाटील लोणावळ्यात तर धास्तावलेले मुख्यमंत्री शिंदे निघाले मुंबईकडे

राज्यातील मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रश्नावरून आतापर्यंत जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटे पर्यंतच मनोज जरांगे पाटील यांना थोपवून धरण्यात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुत्सुद्यांना यश येत होते. परंतु आता काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचेच या उद्देशाने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानाला आपल्या आंदोलनाचे केंद्रस्थान बनविण्याचा …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल… उदयनिधी स्टॅलिनची मते उद्धव ठाकरेंना मान्य आहेत का ?

सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा करणा-या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडी आघाडीमध्ये रहाणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी केला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के स्टॅलिन यांचे सुपूत्र क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे सनातन हिंदू धर्माला संपवण्याची उद्दाम भाषा वारंवार करत …

Read More »

राहुल गांधी यांनी ठणकावले, आणखी ५० गुन्हे दाखल करा, मी घाबरत नाही

मणिपूरहून १४ जानेवारी २०२४ रोजी झालेली भारत जोडो न्याया यात्रा उद्या पश्चिम बंगालमध्ये पोहोचत आहे. दरम्यान आसाममधील यात्रेच्या प्रवासा दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व सरमा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर विविध कलमांखाली जवळपास ५० गुन्हे दाखल केले. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी येथील जाहिर सभेत बोलताना भाजपा, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनप्रकरणी सरकारला निर्देश

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षणाचा लाभ द्यावा या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांना राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. त्यानुसार २० जानेवारीपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मुंबईकडे मार्गक्रमण सुरु केले. मराठा समाजाचा आरक्षण मोर्चा २६ जानेवारी २०२४ रोजी मुंबईत पोहोचणार असून त्या …

Read More »

मोठी बातमीः ईडीमध्ये थेट नोकरीची संधी

सध्या महाराष्ट्रासह देशभरातील राजकिय नेत्यांच्या ऊरात धडकी भरविणाऱ्या ईडी अर्थात सक्तवसुली संचानलायचे नाव जरी घेतले तरी सत्ताधारी पक्षाची वाट धरणारी अनेक राजकारणी आपण पाहिले. यातील राजकिय तथ्य आणि राजकीय व्यंगाचा भाग वगळला तर सध्या देशातील वाढलेल्या बेरोजगारांसाठी ईडीने गोड बातमी दिली आहे. जवळपास १४ पदांकरीता ईडीने नोकर भरती सुरु केली …

Read More »

ममता बँनर्जी यांनी काँग्रेस सोबतच्या युतीची शक्यता फेटाळला

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षासह देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र इंडिया आघाडीतील सहभागी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी नुकतीच काँग्रेसबरोबरील संभाव्य युतीची शक्यता फेटाळत आगामी निवडणूकीत तृणमूल काँग्रेस एकट्याने सामोरे …

Read More »