Breaking News

शिष्टाचारावरून तहसीलदाराच्या पत्राला वन अधिकाऱ्याचे खरमरीत उत्तर

राजकारणात मानापमान नाट्य गावपातळीवरून ते राष्ट्रीय पातळीवर सातत्याने आपल्याला अनेकविध पध्दतीने पहायला मिळते. मात्र राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दोन वेगवेगळ्या विभागातील पदे समकक्ष कोणती आणि वरिष्ठ कोणती याचा उलघडा न झाल्याने पत्र पाठविण्याच्या पध्दतीवरून वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि महसूल यंत्रणेतील तहसीलदार यांच्यात पत्राद्वारे चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे दिसून आले. विशेष …

Read More »

वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास

वीजबिल वसुलीसाठी गेलेले महावितरणच्या कर्मचाऱ्याना मारहाण करून शिवीगाळ केल्या प्रकरणातील आरोपीला दोषी ठरवत अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने दंड व तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. अमरावती येथील विश्वनाथ कॉलनीमध्ये राहणारे गणेश बळीराम तळोकार (५२) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असुन ही घटना ऑक्टोबर २०१८ मध्ये अमरावतीतील फरशी स्टॉपस्थित …

Read More »

शरद पवार म्हणाले, राज्यपालांनी आता मर्यादा ओलांडली…

राज्यात आल्यापासून अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा राज्यपालांचा लौकिक आहे. चुकीची विधाने करून समाजात गैरसमज वाढेल कसा याची खबरदारी घेणे असंच मिशन राज्यपालांचे आहे का? याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शंका व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना …

Read More »

कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा

कृषी विभागाच्या ज्या योजना केंद्र सरकारच्या अर्थसाह्याने राबविण्यात येतात, अशा योजनांसाठी निधी वेळेत मिळण्यासाठी भरीव पाठपुरावा करावा, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. मंत्री सत्तार यांच्या दालनात आज कृषी विभागाच्या विविध योजनांची सद्यस्थिती आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी …

Read More »

महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली का?

राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची आवई उठवल्यानंतर आता ४४ खेडी कर्नाटकला दिली जाणार असल्याच्या धादांत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का ? असा खडा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी उपस्थित केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »

अजित पवार कडाडले, महाराष्ट्र असा – तसा वाटला का?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतेच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर हक्क सांगितल्यानंतर आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यावर हक्क सांगितल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बसवराज बोम्मई यांना चांगलेच सुनावले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या …

Read More »

अजित पवारांचा गौप्यस्फोट, राज्यपाल म्हणाले मुझे अभी नही रहना है

ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महामहिम राज्यपाल महोदयांना विचारांमधील अंधार दूर होऊ दे त्यांच्या वक्तव्यामधील गोंधळ संपू दे… राज्याच्या राज्यपालांना सद्बुद्धी लाभू दे अशी प्रार्थना सगळ्यांच्या साक्षीने अजित पवार यांनी आज केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही वक्तव्य आपण सगळयांनी बघितले ते महाराष्ट्रातील, देशातील कुणालाही …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे गटाने केली उध्दव ठाकरेंच्या राजकिय खेळीची कॉपी?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अँड प्रकाश आंबेडकर एकत्र येणार अशी चर्चा सुरु असताना आता शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना आणि दलित पँथर एकत्र येणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून हाती आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. …

Read More »

अजित पवारांचा सवाल, ३६५ दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्या किती

गुजरात राज्यातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच भर पगारी सुट्टी दिल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्यांवरही भाष्य केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मुळात ३६५ दिवसात जवळपास सर्वच प्रकारच्या पगारी, आजारी सुट्टया असतात त्या जवळपास पावणेदोनशे सुट्टया …

Read More »

सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर

महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या १०० पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता व तात्पुरती निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत असल्याची माहिती, महाराष्ट्र लोकसेवा …

Read More »