भाजपा आणि शिवसेनेतील हाडवैर सर्वश्रुतच आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विधानसभेत नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत नाशिकमधील आपल्या पक्ष नेत्यांना तशी सूचना द्यावी अशी मागणी केली. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भातील माहिती घेवून त्या अनुषंगाने कळविण्यात येईल असे स्पष्ट …
Read More »राज्यपालांनी अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव पुन्हा माघारी पाठविला, दिले हे कारण विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक रखडली
मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली असून त्या विषयीचा प्रस्ताव मागील पावसाळी अधिवेशनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यावेळीही राज्यपालांनी निवडणूकीस मंजूरी दिली नव्हती. आता याविषयीचा प्रस्ताव पुन्हा महाविकास आघाडीने पाठविल्यानंतर तब्बल दोन आठवड्यानंतर राज्यपालांनी सदरचा प्रस्ताव आज राज्य सरकारला …
Read More »संसदेतच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंहांना सुप्रिया सुळेंनी सुनावले, आई-बाप काढायचे नाहीत काश्मीर प्रश्नावरील चर्चे दरम्यान झाली शाब्दीक खडाजंगी
पाच राज्यातील निवडणूकीनंतर पुन्हा एकदा संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरू झाले असून आज काश्मीर प्रश्नी संसदेत चर्चा सुरु असताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावत आई-बाप काढायचे नाहीत असा सज्जड दमच भरला. लोकसभेमध्ये सोमवारी जम्मू काश्मीरच्या अर्थसंकल्पासंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी जम्मू काश्मीरमधील …
Read More »म्हाडाच्या ट्रांझीट कॅम्पमध्ये घुसखोरी झाली तर रेंट कलेक्टर घरी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
मुंबईत असलेल्या संक्रमण शिबीरात जे घुसखोर बेकायदेशीर वास्तव्यास आहेत, त्यांची चौकशी सुरू केली असून त्यांना बाहेर काढावे लागेल. यापुढे संक्रमण शिबीरात घुसखोर घुसणार नाहीत, यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. घुसखोर आढळल्यास त्याठिकाणच्या रेंट कलेक्टरला घरी बसवले जाईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली. मुंबई शहरात अनेक मोडकळीस …
Read More »तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायद्याची अंमलबजावणी, अन्यथा शाळांवर कारवाई पिवळी रेषा रेखांकन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार- राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम
केंद्र शासनाच्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा)-२००३ ची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत असून या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्डच्या परिसरामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, उत्पादन, वितरण, साठवण करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरणांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरामध्ये पिवळी रेषा रेखांकित केली जात असून …
Read More »भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल नाहीत ‘भाजप’पाल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात व्हावी : नाना पटोले
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या, असे असा उपरोधिक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला. विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी …
Read More »शेतकऱ्यांच्या वीज तोडणी प्रश्नी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केले हे निवेदन वीज तोडणीपासून शेतकऱ्यांना तीन महिन्यांची मुदत
सभागृह सुरू झाल्यापासून सातत्याने संसदीय आयुधे वापरून सदस्यांनी तसेच सभागृहाच्या बाहेरही कृषी पंप वीज तोडणीचा विषय उपस्थित केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा अनेकदा या विषयावर प्रश्न उपस्थित करून सभागृहाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, कुणाल पाटील,प्रकाश सोळंके,आमदार कल्याणकर यांनी तसेच विरोधी पक्षांनी हे मुद्दे उपस्थित केले. महावितरण कंपनी …
Read More »सत्ताधारी- विरोधकांच्या आक्रमक पावित्र्यापुढे अखेर ऊर्जा मंत्र्यांनी मान्य केली मागणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांना अक्षरश बोलावून आणले
विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचा प्रश्न उपस्थित केला असतानाच शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांच्या वीज प्रश्न ऐरणीवर आणला. मतदारसंघात गेले की शेतकरी विचारतात आमची वीज कापली गेली. काय करायचे? हातचे पीक पुन्हा एकदा जाईल काही तरी करा अशी आर्जवे शेतकरी करत असल्याचे …
Read More »दरेकरांच्या प्रश्नी बोलताना फडणवीसांच्या माहितीची राष्ट्रवादीच्या आमदाराने केली दुरूस्ती प्रविण दरेकरांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्हेप्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशारा
अर्थसंकल्पावरील चर्चे दरम्यान काल विधानसभेत बोलताना विधानसभेतील विरोधई पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता महाविकास आघाडीकडून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना लक्ष करणार असल्याचे ऐकत आहोत. परंतु आम्ही कोणत्याही कारवायांना घाबरणार नाही असा इशारा दिला होता. त्यास २४ तासाचा अवधी मिळत नाही तोच प्रविण दरेकर यांच्या विरोधात आज मंगळवारी …
Read More »कर्नाटक न्यायालयाचा निर्णय, हिजाब धार्मिक प्रथा नाही, भगवी वस्त्रेही घालायची नाहीत न्यायालयाच्या निर्णयाचे मुस्लिम समुदायाबरोबरच सर्वचस्तरात उमटल्या प्रतिक्रिया
जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या हिसाब प्रकरणाच्या सुणावनीवर आज अंतिम निर्णय दिला असून या निर्णयात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने राज्य सरकारचा निर्णय उचलून धरला आहे. राज्य सरकारने हिसाब परिधान करून शाळा, कॉलेजात येण्यास मज्जाव केला होता. न्यायालयानेही याच निर्णयाला मंजूरी देत हिसाब परिधान करणे हा काही …
Read More »
Marathi e-Batmya