मराठी ई-बातम्या टीम पवारांवर बोलणाऱ्या फडणवीसांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर पवारसाहेब काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज दिला. राष्ट्रवादी काँग्रेस साडेतीन जिल्हयाचा पक्ष बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नवाब मलिक …
Read More »शिवरायांच्या अमरावतीतील पुतळ्याची सन्मानपूर्वक प्रतिष्ठापना करा भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी
मराठी ई-बातम्या टीम अमरावतीमध्ये पोलिसांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांविषयीचे राज्य सरकारचे प्रेम बेगडी असल्याचे उघड झाले असून हा पुतळा अनधिकृत असल्याचे कारण देत तो हटविण्याऐवजी, त्याची तातडीने सन्मानाने अधिकृतपणे स्थापना करावी अशी मागणी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात …
Read More »धक्कादायक बातमी: कोरोना काळात देशातील श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी वाढ ऑक्सफॉमच्या अहवालानुसार देशातील टॉप १० श्रीमंताकडे ४५ टक्के संपत्ती
मराठी ई-बातम्या टीम कोरोना महामारीच्या काळात एकीकडे देशातील गरीब जनतेसमोर खाण्यापिण्याचे संकट असताना दुसरीकडे या काळात देशातील श्रीमंतांची संख्या वाढली आहे. वर्ष २०२१ मध्ये भारतातील अब्जाधीशांची संख्या १०२ वरून १४२ झाली असल्याचे एनजीओ ऑक्सफॅम इंडियाच्या अहवालातून समोर आले आहे. आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२२ चा पहिला दिवस आहे. या निमित्ताने ऑक्सफॅम इंडियाने वार्षिक असमानता सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे. यानुसार, कोरोनाच्या काळात भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती दुप्पट झाली आहे. त्यांच्या संपत्तीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की टॉप १० श्रीमंतांकडे इतकी संपत्ती आहे की ते पुढील २५ वर्षे देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये चालवू शकतात. कोरोनामुळे विषमता इतकी वाढली आहे की देशातील सर्वात श्रीमंत १०% लोकांकडे देशातील ४५% संपत्ती आहे. त्याच वेळी देशातील ५०% गरीब लोकांकडे फक्त ६% संपत्ती आहे. अहवालात म्हटले आहे की, जर भारतातील टॉप १०% श्रीमंत लोकांवर १% अतिरिक्त कर लावला गेला तर त्या पैशातून देशाला १७.७ लाख अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर मिळतील. त्याच वेळी देशातील ९८ श्रीमंत कुटुंबांवर १% अतिरिक्त कर लावला, तर त्या पैशातून आयुष्मान भारत कार्यक्रम पुढील सात वर्षे चालवता येईल. आयुष्मान भारत हा जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा कार्यक्रम आहे. या आर्थिक असमानता अहवालानुसार, देशातील १४२ अब्जाधीशांची एकूण संपत्ती ७१९अब्ज डॉलर म्हणजेच ५३ लाख कोटी रुपये आहे. ९८ श्रीमंत लोकांकडे ५५५ कोटी गरीब लोकांइतकीच संपत्ती आहे. ही संपत्ती सुमारे ६५७ अब्ज डॉलर म्हणजे ४९ लाख कोटी रुपये आहे. या ९८ कुटुंबांची एकूण संपत्ती भारत …
Read More »मेट्रोची चाचणीच करायची होती तर एकट्या शरद पवारांना का निमंत्रण ? भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका
मराठी ई-बातम्या टीम पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज मेट्रोची चाचणी घेऊन जणू काही त्यांच्यामुळे पुणे मेट्रोचा प्रकल्प झाल्याचे प्रशासनाने भासविणे म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या असा प्रकार आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींना डावलून केवळ राज्यसभा सदस्य असलेल्या एका नेत्याच्या उपस्थितीत चाचणी घेतल्याबद्दल मेट्रो प्रशासनाविरोधात आपण …
Read More »भाजपा आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून धक्का आणि दिलासा २७ जानेवारी पर्यत अटक करता येणार नाही
मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. परंतु राणे यांच्या वकीलांनी २७ जानेवारीपर्यंत आपल्यावर कोणतीही कारवाई करू नये अशी मागणी केली. त्यावर अखेर राज्य सरकारच्यावतीने २७ जानेवारीपर्यत अटक करणार नसल्याचे तोंडी आश्वासन न्यायालयाला दिल्याने राणे …
Read More »शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा रयतचे विश्वस्त एन.डी.पाटील यांचे निधन ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील शेतकरी कामगार पक्षातून सत्तेच्या हव्यासापायी अनेक जणांनी इतर पक्षात प्रवेश करत सत्ता उपभोगली. मात्र शेकापच्या विचारावर अढळ निष्ठा ठेवत शेवटपर्यत शेकापमध्ये रहात विविध सामाजिक लढ्यात आपले योगदान देणारे प्रा.एन.डी.पाटील यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी कोल्हापूरात निधन झाले. मागील दिवसापासून त्यांची तब्येत ठिक नसल्याने पाटील यांच्यावर उपचार …
Read More »प्रसिध्द कथ्थक नृत्यविशारद पंडित बिरजू महाराज यांचे निधन वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी ई-बातम्या टीम ख्यातनाम कथ्थक नृत्यविशारद आणि नृत्यातील पंडीत म्हणून ओळखले जाणारे पंडित बिरजू महाराज यांचे आज वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. कथ्थक नृत्यातील त्यांच्या कलासाधनेमुळे पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले …
Read More »आणि वडेट्टीवारांनी उडविली पडळकरांची खिल्ली, “नया नया पंछी ज्यादा फडफड…” वडेट्टीवार पडळकरांचा ओबीसीवरून नवा वाद
मराठी ई-बातम्या टीम ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयात उद्या सोमवारी सुणावनी असून या पार्श्वभूमीवर ओसीबी समाजाचा इम्पिरियल डेटा गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाचे काम अद्याप सुरु झाले नाही. तसेच आयोगाला ४५० कोटी रूपये देण्याची घोषणा करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात साडेचार कोटी रूपये दिल्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी …
Read More »पडळकरांचा मंत्री वडेट्टीवारांना टोला, “फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं” ओबीसी विभागासाठी फक्त साडेचार कोटी दिले
मराठी ई-बातम्या टीम ओबीसी मंत्री विजय वडेडट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली. वास्तवात फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेश ही आयोगाला मिळाले नाहीत. ना ॲाफीस ना पुर्णवेळ सचिव. आणि आयोगाचे संशोधक सोलापूरात आणि आयोग पुण्यात अशी खरपूस …
Read More »राज्यात ४१ हजार आढळले तर ४० हजार बरे होवून घरी : जाणून घ्या जिल्ह्यात किती रूग्ण होम क्वारंटाईनची संख्या २२ लाखाच्या जवळपास
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाबाधित रूग्णांची संख्या चांगलीच स्थिरावत असून बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसून येत आहे. मात्र होम क्वारंटाईनमधी रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरू पहात आहे. मुंबईत आज ७ हजार ८९५ इतके रूग्ण आढळून आले असून ठाण्यातील शहर व जिल्हा, मीरा …
Read More »
Marathi e-Batmya