Breaking News

राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर राज्य सरकारने केली ही कारवाई शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र नागरी सेवेतील नियमान्वये तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. हा आदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे हे सुपे यांचे मुख्यालय राहील आणि त्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. …

Read More »

गुजर यांच्या घोषणेनंतर मंत्री परिवहन मंत्री परब म्हणाले… गुन्हे दाखल झालेल्यांवर कारवाई पूर्ण झाल्यानंतरच गुन्हे मागे घेवू

मराठी ई-बातम्या टीम एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे अजय गुजर यांच्याबरोबरील चर्चेनंतर गुजर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यांच्यावरील कारवाई कामगार कामावर आल्यानंतर मागे घ्यावी. त्यावर कामगार कामावर आले आणि डेपो चालू झाले तर आम्ही कारवाई मागे …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांच्या अजय गुजर यांच्या संघटनेकडून संप मागे, पण कर्मचारी ठाम संप नाहीतर हा तर आमच्यासाठी दुखवटा: कर्मचाऱ्यांच्या भावना

मराठी ई-बातम्या टीम जवळपास दोन महिने राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून या संपातून अजय गुजर यांच्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेने या संप मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे एसटी विलिनीकरणप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात सुणावनी सुरु असताना दुसऱ्याबाजूला राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल …

Read More »

एसटी विलिनीकरणाचा निकाल २२ डिसेंबरला, मात्र महामंडळ म्हणते अवघड अंतिम निकाल काय लागणार याबाबत एसटीबाबत काय निकाल लागणार याची उत्सुकता

मराठी ई-बातम्या टीम जवळपास महिन्याहून अधिक काळ एसटीच्या विलिनीकरणाच्या मुख्य प्रश्नावरून पुकारण्यात आलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अद्यापही संपुष्टात आलेले नाही. त्यातच आज झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत पुढील सुणावनी २२ डिसेंबरला घेणार असल्याचे सांगत आज दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतला. यावेळी एसटी महामंडळाने केलेल्या युक्तीवादावेळी राज्य सरकारी वकीलांनी आतापर्यत कर्मचाऱ्यांना …

Read More »

भरती परीक्षा गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील सरकारी नोकरभरतीच्या पेपरफुटीची आणि परीक्षांमधील घोटाळ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केले. या घोटाळ्यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत जात असल्याने सीबीआयनेच याची चौकशी करणे योग्य ठरेल, असे ते म्हणाले. कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत …

Read More »

शेअर बाजारात त्सुनामी, सेन्सेक्स तब्बल ११९० अंकाने कोसळला ओमायक्रॉनचा परिणाम शेअर बाजारावर

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे जगातील बिघडलेली परिस्थिती आणि जागतिक बाजारातील कमजोरी याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सेन्सेक्स तब्बल १,१८९.७३ (२.०९%) घसरून ५५,८२२.०१ वर बंद झाला. निफ्टी देखील ३७१.०० (२.१८%) ने १६,६१४.२० वर घसरला. या मोठ्या पडझडीत गुंतवणूकदारांना तब्बल ११ …

Read More »

संसदेत निवडणूक कायदा विधेयक मंजूरः मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड जोडावे लागणार मंत्री किरण रिजूजी म्हणाले आधार कार्ड जोडणे बंधनकारक नाही

मराठी ई-बातम्या टीम दरवेळी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभा निवडणूकांपर्यंत प्रत्येक निवडणूकांमध्ये बोगस मतदान केल्याच्या चर्चेला सुरुवात होते. या बोगस मतदारांना रोखण्यासाठी आज संसदेत इलेक्ट्रॉल लॉ (अमेंडमेंट) बील २०२१ हे विधेयक मंजूर करण्यात आले असून मतदाराची ओळख पटविण्यासाठी त्याचे आधार कार्ड मतदान ओळखपत्राशी जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. मात्र …

Read More »

ओबीसी मोर्चावरून वंचितचे अॅड. आंबेडकर म्हणाले, आमचा आवाज दाबू शकणार नाही ओबीसींच्या जाती निहाय जनगणनेसाठी २३ डिसेंबर रोजी विधानभवनावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा धडकणारच

मराठी ई-बातम्या टीम ‘वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी विधानसभा अधिवेशनावर २३ डिसेंबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र राज्य सरकार मुंबईमध्ये विनाकारण जमावबंदी लागू करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. मुंबईत जमावबंदी लावण्याचे कोणतेही सबळ कारण दिसत नाहीये. सरकार कायद्याचा दुरुपयोग करून जनतेचा आवाज दाबणार …

Read More »

पंतप्रधान कुठे गायब होते? हे अमित शहांनी सांगावे दलालांचा ठेकेदार भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडे बोट करू नये !: नाना पटोले.

मराठी ई-बातम्या टीम देशातील महत्वाच्या सार्वजनिक कंपन्या आपल्या मोजक्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालणारा देशातील सर्वात मोठा ‘डिलर’ व ‘ब्रोकर’चे काम करणाऱ्या भारतीय जनात पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर आरोप करणे हेच हास्यास्पद आहे. राफेलमधील दलाली, नोटबंदीमध्ये जुन्या नोटा बदलून देण्याच्या मोबदल्यात कोणत्या पक्षाच्या लोकांनी करोडो रुपयांची दलाली खाल्ली हे …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णयः वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांचे होणार भव्य स्मारक स्मारकाच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजूरी

मराठी ई-बातम्या टीम वढु बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तत्वत: मंजूरी दिली. छत्रपती संभाजी महाराजांचे साकारण्यात येणारे स्मारक त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे, भव्य दिव्य असले पाहिजे. या स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धेचे आयोजन करुन त्यातून सर्वोत्कृष्ट …

Read More »