Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंचे संकेत तर टोपेंकडून थेट वेळाच जाहिर राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविणार; अम्युझमेंट पार्क देखील सुरू करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील काही महिन्यापासून राज्यात कोरोना बाधित आढळून येण्याच्या संख्येत चांगलीच घट होताना दिसत आहे. तसेच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे, उपाहरागृहे, दुकानांच्या वेळात वाढ करण्याचे संकेत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले. मात्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी थेट वेळाच जाहिर करत दुकानांच्या वेळा रात्री …

Read More »

फेस्टिवल ऑफर : बँक ऑफ इंडियाकडून गृह, वाहन कर्जाच्या व्याज दरात कपात प्रक्रिया शुल्कही नाही

मुंबईः प्रतिनिधी सणासुदीच्या काळात बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गृहकर्ज आणि वाहन कर्जावर सूट जाहीर केली आहे. बँकेने आपल्या गृह कर्जावरील व्याजदरात ०.३५ टक्के कपात केली आहे. या कपातीनंतर, बँकेचे गृहकर्ज दर ६.५० टक्क्यापासून सुरू होईल. हा विशेष दर १८ ऑक्टोबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत लागू असेल. व्यतिरिक्, …

Read More »

अंमली पदार्थ विरोधी कारवाईत अडथळे आणण्याचे ‘राष्ट्रवादी’चे प्रयत्न भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र

मुंबईः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे झालेले प्रचंड नुकसान, मराठवाड्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा घटना राज्यात घडत असताना त्यावर बोलण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आपल्या जावयाचा केविलवाणा बचाव करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तंबाखू, गुटखा अशा पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांची माहिती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वनस्पती असल्याचे …

Read More »

आतापर्यंत पेट्रोल २१.८७ रुपये तर डिझेल २०.४५ रुपयांनी महागले मुंबईत १११ वर पेट्रोल तर डिझेल १०२.५२ रुपयांना

मुंबईः प्रतिनिधी सरकारी तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. मुंबईत आता पेट्रोलचा भाव प्रति लिटर १११.७७ रुपयांवर गेला आहे. तर डिझेल १०२.५२ रुपयांना मिळत आहे. या महिन्यात १७ दिवसात पेट्रोल आणि डिझेल १४ वेळा महाग झाले आहे. यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल ४.२० रुपये …

Read More »

एनसीबीने असं बेताल बडबडणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे, की ते काय मारतात का? शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी दादरा नगर हवेलीतील दहशतीला फोडली वाचा

सिल्वासा : वृत्तसंस्था-प्रतिनिधी मला माहिती नाही म्हणजे महाराष्ट्रात किंवा देशात गांजाचं पीक जास्त निर्माण झालंय आणि काही लोक गांजा मारून काम करतात, हे दिसतय.. दसरा मेळव्यानंतर मला वारंवार दिसतय की, ज्या प्रकारे विरोधी पक्ष बेतालपणे बोलतोय. या सर्वांची आता नार्कोटेस्ट केली पाहिजे. एनसीबीने असं बेताल बडबडणाऱ्यांची टेस्ट केली पाहिजे, की …

Read More »

मोदीजी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या की जनतेच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी मागील सहा महिन्यापासून सातत्याने देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सद्यपरिस्थितीत देशातील जवळपास १२ राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दराने १०० री ओलांडली असल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. २०१४ साली देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा हाती घेतल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दर कमी झाले होते. त्यावेळी गुजरात मध्ये झालेल्या …

Read More »

आरोग्य विभागाच्या परिक्षा गोंधळावर संचालकांचा खुलासा विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार-आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील

मुंबई: प्रतिनिधी आरोग्य विभागाकडून घेण्यात येत असलेल्या परिक्षेतील गोंधळ काही केल्या कमी होण्यास तयार नसून अनेक परिक्षास्तुक उमेदवारांना त्यांनी मागितलेल्या परिक्षा केंद्रापेक्षा वेगळेच केंद्रे मिळाले असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालिका डॉ.अर्चना पाटील यांनी यावर खुलासा करत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र …

Read More »

नातू मुख्यमंत्री ठाकरेंच्या नजरेतून आजोबा प्रबोधनकार ठाकरे ‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई: प्रतिनिधी शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्री हा बहुमान आणि प्रबोधनकरांचा नातू असणे हे …

Read More »

शरद पवार लवकरचं भेटणार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहना सीमा सुरक्षा दलाला दिलेल्या अधिकारामुळे देशाच्या फेडरल स्ट्रक्चरला धक्का

पिंपरी-चिंचवड: प्रतिनिधी राज्य आणि केंद्र अधिकाराच्या अनुषंगाने राज्यघटनेने निर्धारीत केलेल्या फेडरल स्ट्रक्चरला धक्का देणारा निर्णय केंद्र सरकारने पुन्हा एकदा घेत आंतरराष्ट्रीय सीमावर्ती असलेल्या भागातील राज्यांच्या ५० किलोमीटर परिसरात तपासणी करण्याचे राज्यांच्या पोलिसांइतकेच अधिकार केंद्रीय सीमा सुरक्षा दलास दिला. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्राने राज्यांच्या अधिकार अतिक्रमण केल्याप्रकरणी आपण लवकरच केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात… घाबरणार नाही पण आम्ही उंदीर बाहेर काढू राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई: प्रतिनिधी अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात…आम्ही कुणाला घाबरणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. देवेंद्र फडणवीस यांनी एजन्सीचा वापर केला असता तर अर्धे मंत्रीमंडळ तुरुंगात असते असे वक्तव्य केले होते त्याचा नवाब मलिक यांनी …

Read More »