Breaking News

राकेश झुनझुनवाला यांची अकासा एअरही आता आकाशात झेपावणार नवीन विमान कंपनीला सरकारकडून परवानगी

मुंबई : प्रतिनिधी शेअर बाजारातील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअर या नवीन विमान कंपनीला सरकारकडून परवानगी मिळाली आहे. केंद्रीय नागरी नागरी उड्डायन मंत्रालयाने अकासा एअरलाईन्सला विमान उड्डाणाचा ना हरकत दाखला दिला आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीअंतर्गत अकासा एअर सेवा देणार आहे. कंपनीला आता नागरी हवाई वाहतूक महासंचालक …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यात ठरले या रस्त्यांची कामे होणार मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांबाबत लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि …

Read More »

आणि शिवसेनेची शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा झाली खंडीत प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाल्यापासून जवळपास २५ वर्षाहून अधिक काळ दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर होत आला आहे. मात्र मागील वर्षापासून कोरोनामुळे दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. मात्र यावर्षी कोरोना बाधितांच्या संख्येत चांगलीच घट आल्याने यंदाच्यावर्षी तरी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात …

Read More »

… तसा प्रकार लखीमपूरला झाला नाही आयकर छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे : प्रतिनिधी राज्यात गेले पंधरा दिवस चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन करण्यात आले. तथापि, जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने बंद फसला आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून पुकारलेल्या या बंदच्या विरोधात भाजपाची …

Read More »

भाजपाचा ढोंगीपणा उघड झाल्याने त्यांना शेतकरीप्रश्नी बोलण्याचा अधिकार नाही शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी व शेतक-यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील जनतेने व व्यापा-यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतक-यांच्या न्यायाच्या लढाईला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून शेतक-यांना न्याय मिळवून देईपर्यंत संघर्ष करत …

Read More »

मार्केट कॅप आणि कॅपिटलमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज १ ल्या स्थानावर मार्केट कॅपिटलमध्ये प्रथमच कोट्यावधीवर

मुंबई : प्रतिनिधी शेअर बाजारातील जोरदार तेजीमुळे देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅपिटल प्रथमच १७ लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहेत.  सोमवारी सकाळी रिलायन्सच्या शेअर्समध्ये आलेल्या तेजीमुळे कंपनीचे मार्केट कॅपिटल मोठ्या प्रमाणावर वाढले. समूहाचा विचार करता टाटा समूह सध्या मार्केट कॅपमध्ये सर्वात पुढे आहे.  टाटा समूहातील एकूण २९ …

Read More »

लखीमपूर के दरिंदो को फाशी दो… फाशी दो प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष तथा मंत्री नवाब मलिकांच्य नेतृत्वाखाली आंदोलन...

मुंबई : प्रतिनिधी मोदी सरकार हाय हाय… योगी सरकारचा धिक्कार असो… भाजप सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… लखीमपूर के दरिंदो को फाशी दो… फाशी दो… किसानो के सम्मान मे राष्ट्रवादी मैदानमे… अशा जोरदार घोषणाबाजी देत राष्ट्रवादीने हुतात्मा चौक दणाणून सोडला. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खीरी येथे भाजपचे नेते आणि …

Read More »

भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजपावर हल्लाबोल

मुंबई: प्रतिनिधी भाजपला सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपवर शरसंधान साधले. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र बंदला भाजपाने विरोध दर्शवित शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या गोष्टीचे अप्रत्यक्ष असमर्थन करत असल्याचा आरोप केला. आज लखीमपूर हत्याकांड प्रकरणी निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने …

Read More »

एसबीआयची फेस्टिव्हल ऑफर; पर्सनल, कार, गोल्ड लोनचे व्याजदर घटवले नवरात्रीसाठी खास ऑफर

मुंबई : प्रतिनिधी स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) या नवरात्रीसाठी खास ऑफर आणली आहे. यामध्ये एसबीआय पर्सनल लोन, कार आणि सोने तारण  कर्ज कमी व्याज दरात देत आहे. याशिवाय बँकेने कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआय सध्या ७.२५ टक्के व्याज दराने कार कर्ज देत आहे. ग्राहकांना कारच्या …

Read More »

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंद ही तर सुरुवात आहे पण….. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी साधला केंद्र सरकावर निशाणा

मुंबई : प्रतिनिधी मागील आठ ते दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचं आंदोलन, ट्रॅक्टर रॅलीच्या माध्यमातून, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून, दिल्लीत लाल किल्ल्यावर पोहचण्यापर्यंत. लोकांची सहनशीलता आता संपलेली आहे. शेतकरी विरोधी जे कायदे केंद्र सरकारने केलेले आहेत, त्याबाबत खूप लोकांच्या मनात रोष आहे, नाराजी आहे आणि कायदे बदलण्यासाठी केंद्र सरकार अजिबात …

Read More »