Breaking News

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीने घेतले हे निर्णय भाजप आणि केंद्र सरकारच्या एजन्सींच्या विरोधात राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने लढणार - नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय नेत्यांना त्रास देण्याचे काम होत असून याविरोधात पूर्ण ताकदीने लढण्याची भूमिका पक्षाने घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली. आज राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी यामध्ये …

Read More »

भाजपाच्या कोअर कमिटीत काय ठरलं? अॅड आशिष शेलार यांनी दिली ही माहिती आघाडीला सळो की पळो करणार

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील जनतेला जी मदत, सेवासुविधा मिळणे आवश्यक आहे, त्या गोष्टींचा विकास महाविकास आघाडी करू शकत नाहीत. शेतकऱ्याला काहीही मिळत नाही, विद्यार्थ्याला मिळत नाही, बारा बलुतेदारांचा मिळत नाही, आमच्या दलित समाजाच्या बंधू-भगिनींना मिळत नाही, मराठा समाजाला मिळत नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी आंदोलनाची रुपरेषा सुध्दा आज आम्ही …

Read More »

राज्यातील नाट्यगृहे- मोकळ्या जागेतील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील नाट्यगृहे मार्गदर्शक तत्वांच्या अधिन राहून नियंत्रित स्वरुपात येत्या २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली असून याबाबतचा शासन निर्णय ११ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्गमित करण्यात …

Read More »

भारनियमन करणार नाही, पण ग्राहकांनो वीज वापर काटकसरीने करा वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : प्रतिनिधी कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची वीजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यातील कोळसा टंचाई …

Read More »

२२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरु: हि मार्गदर्शक तत्वे प्रेक्षक-थिएटर मालकांसाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील चित्रपटगृहे २२ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली. राज्यातील कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ११ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामध्ये चित्रपटगृहांनी …

Read More »

राकेश झुनझुनवाला यांची अकासा एअरही आता आकाशात झेपावणार नवीन विमान कंपनीला सरकारकडून परवानगी

मुंबई : प्रतिनिधी शेअर बाजारातील बडे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअर या नवीन विमान कंपनीला सरकारकडून परवानगी मिळाली आहे. केंद्रीय नागरी नागरी उड्डायन मंत्रालयाने अकासा एअरलाईन्सला विमान उड्डाणाचा ना हरकत दाखला दिला आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीअंतर्गत अकासा एअर सेवा देणार आहे. कंपनीला आता नागरी हवाई वाहतूक महासंचालक …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यात ठरले या रस्त्यांची कामे होणार मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांचे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी या प्रकल्पांच्या कामांचा मंत्रालयातून नियमित आढावा घेण्यात येणार आहे. भूसंपादन आणि वन विभागाशी संबंधित बाबींमुळे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांबाबत लवकरच निर्णय घेऊन ही कामे मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि …

Read More »

आणि शिवसेनेची शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा झाली खंडीत प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी दिली माहिती

मुंबई: प्रतिनिधी १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाल्यापासून जवळपास २५ वर्षाहून अधिक काळ दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर होत आला आहे. मात्र मागील वर्षापासून कोरोनामुळे दसरा मेळावा शिवतीर्थावर झाला नाही. मात्र यावर्षी कोरोना बाधितांच्या संख्येत चांगलीच घट आल्याने यंदाच्यावर्षी तरी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात …

Read More »

… तसा प्रकार लखीमपूरला झाला नाही आयकर छाप्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीचा बंद: भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पुणे : प्रतिनिधी राज्यात गेले पंधरा दिवस चालू असलेल्या आयकर विभागाचा छाप्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने बंदचे आवाहन करण्यात आले. तथापि, जनतेचा मनापासून प्रतिसाद नसल्याने बंद फसला आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून पुकारलेल्या या बंदच्या विरोधात भाजपाची …

Read More »

भाजपाचा ढोंगीपणा उघड झाल्याने त्यांना शेतकरीप्रश्नी बोलण्याचा अधिकार नाही शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू

मुंबई: प्रतिनिधी उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी व शेतक-यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्यातील जनतेने व व्यापा-यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. राज्यभरात सर्वच जिल्ह्यांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. शेतक-यांच्या न्यायाच्या लढाईला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून शेतक-यांना न्याय मिळवून देईपर्यंत संघर्ष करत …

Read More »